नवी दिल्ली, 25 मार्च : लोक आजकाल आपलं वजन, आरोग्य याबाबत मोठ्या प्रमाणात जागरुक झाले आहेत. त्यामुळे अनेकजण व्यायाम, जीम, डाएट अशा गोष्टींवर विशेष लक्ष देतात. आपलं वजन, शरीर संतुलित ठेण्याचा प्रयत्न करतात. मेहनत घेत आपला लठ्ठपणा कमी करतात. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय आजमावत असतात. याच्या अनेक घटनाही समोर येत असतात. अशातच आणखी एक घटना समोर आली असून एका कपलने डाएट-व्यायामशिवाय 133 किलो वजन कमी केलं आहे. हे ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
जोडप्यानं वजन कमी करण्यासाठी एक अनोखा शॉर्टकट शोधून काढला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा रंगलेली पहायला मिळतेय. नॉर्थ यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या कॅथरीन आणि डीन या कपलने त्यांचे वजन सुमारे 133 किलोने कमी केले आहे. हे वजन दोघांचे मिळून आहे. पण यासाठी त्यांनी ना डाएट केला ना व्यायाम. दोघांनी केवळ 6 लाख रुपये खर्च करून शरीर बदलले. त्यांनी गॅस्ट्रिक बायपास ऑपरेशनद्वारे केलं आहे. मात्र, हा शॉर्टकट स्वीकारण्यामागे या जोडप्याचे खास कारण होतं. या जोडप्याने त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन सोशल मीडियावर शेअर केलंय.
कॅथरीन आणि डीन या जोडप्याने ऑपरेशनच्या माध्यमातून 133 किलो वजन कमी केले. 31 वर्षाची कॅथरीन तिच्या वजनामुळे IVF साठी पात्र होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत या दाम्पत्याने पालक होण्यासाठी हे पाऊल उचलले. ऑपरेशननंतर कॅथरीनने सांगितले की आता तिला खूप हलके वाटते. तसेच, तिला पूर्वीपेक्षा खूप एनर्जी वाटत आहे. कॅथरीन 162 किलो होती. तसेच, त्याला कपडेही मिळत नव्हते. पण आता तिचे वजन खूप कमी झाले आहे.
कॅथरीनने आई होण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली. पण तिच्या नवऱ्याने तिला साथ दिली. दोघांनी ही वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करून घेतली आणि आता त्याचा रिजल्ट सर्वांसमोर आहे. मात्र, त्यांच्या परिवर्तनानंतर दोघांनीही आता हेल्दी लाइफस्टाइल स्वीकारणार सांगितलंय. दोघेही आता हेल्दी खाण्यासोबतच स्वतःला खूप सक्रिय ठेवतात.
दरम्यान, गॅस्ट्रिक बायपास या ऑपरेशनमध्ये मानवी पोटाचा आकार कमी केला जातो. अशा स्थितीत माणूस कमी खातो आणि आपोआप त्याचे वजन कमी होत जाते. त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन सध्या सर्वांना थक्क करत आहे. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Lifestyle, Top trending, Viral, Viral news, Weight, Weight loss