दिल्ली, 02 सप्टेंबर : बैलाच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. त्यामुळे एका बैलाचा हल्लाही किती खतरनाक असतो हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. बैलाने जर हवेत उडवून जमिनीवर पाडलं तर व्यक्तीला हलताही येत नाही. विचार करा, अशा एक-दोन नव्हे तर पाच-पाच बैलांनी एकाच वेळी हल्ला केला तर काय होईल, असाच धक्कादायक व्हिजीओ समोर आला आहे (Bulls attack on man). चवताळलेल्या बैलांच्या कळपासमोर एक तरुण आला. हा तरुण या बैलांच्या समोर पळू लागला. त्यानंतर बैलांनी या तरुणाला गाठलं, त्याला घेरलं आणि एकाच वेळी त्याच्यावर हल्ला केला. पाच बैलांनी या तरुणावर अटॅक केला. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला काही तरुण रस्त्यावर पळताना दिसत आहे. या सर्वांच्या मागून चवताळलेल्या बैलांचा कळप धावत येताना दिसतो. बैलांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून काही जण रस्त्यावरून बाजूला हटतात. रस्त्याच्या कडेला जातात. एक तरुण मात्र रस्त्याच्या मध्येच धावत जातो. हे वाचा - क्षणात उलटला शिकारीचा डाव! शिकार करायला आलेल्या वाघालाच बैलाने…; WATCH VIDEO त्याचवेळी एक बैल त्याला गाठतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. बैल त्याच्या पाठीत आपली शिंग खुपसणार तोच बैलाचा पाय घसरतो आणि तो खाली पडतो. या बैलापासून तरुण कसाबसा वाचतो आणि पळतो. तितक्या मागून आणखी दोन बैल येतात. त्यापैकी एक आपल्या शिंगांवर त्याला धरून हवेत उडवतो आणि जमिनीवर आपटतो. त्यानंतर दोन बैल त्याला चिरडणार आणि मागून येणारे काही बैल त्याला तुडवणार तोच तो तरुण कसाबसा उठतो आणि तिथून पळू लागतो. त्याचवेळी मागून आणखी एक बैल त्याच्यावर अटॅक करायला येतो. तोपर्यंत सुदैवाने तरुण स्टँडमध्ये असलेल्या प्रेक्षकांमध्ये जाण्यास यशस्वी होतो. त्यामुळे बैल तिथंच पाहत उभा राहतो पण तो स्टँडच्या आत जाऊन त्याच्यावर हल्ला करत नाही. यामुळे या तरुणाचा जीव वाचतो.
स्पेनमध्ये बैलांचा असा खतरनाक खेळ होतो. ज्यात चवताळलेल्या बैलांसमोर माणसांना पळावं लागतं. हा व्हिडीओही अशाच खेळाचा असावा. कारण यात प्रेक्षकही दिसत आहेत. पण याबाबत स्पष्टपणे सांगू शकत नाही. तसंच हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हेसुद्धा माहिती नाही. हे वाचा - बापरे! इशाऱ्यावर नाचता नाचता अस्वलाने ट्रेनरसोबत केलं धक्कादायक कृत्य; Shocking Video @ViciousVideos ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने या तरुणाने पाच वेळा मृत्यूवर मात केल्याचंही म्हटलं आहे.