मुंबई, 31 ऑगस्ट : वाघ, सिंह, बिबट्या या प्राण्याच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आहेच. खतरनाक प्राण्यांसमोर छोट्या किंवा साध्या प्राण्यांचा टिकाव लागत नाही. पण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. हेच एका बैलाने दाखवून दिलं आहे. वाघासारखा भयानक प्राणी शिकार करायला येताच बैल अशी चाल खेळला की वाघाच्या शिकारीचा डाव त्याने क्षणात उलटवून लावला. वाघ आणि बैलाच्या शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वाघ आणि बैल दोघं आमनेसामने आले तर कोणता प्राणी जिंकेल असं विचारलं तर साहजिकच आपण वाघ म्हणू. पण वाघ आणि बैलाच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असं काही घडलं ज्याचा आपण विचारही केला नसेल. बैलासमोर वाघाची अक्षरशः मांजरच झाली असंच म्हणावं लागेल. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक वाघ जंगलातून रस्त्यावर येताना दिसतो. रस्त्याच्या किनाऱ्यावर येऊन तो उभा राहतो. इतक्यात रस्त्यावर समोरून एक बैल धावत येत असतो. बैलाला पाहताच वाघ तिथंच थांबतो. बैलाची शिकार करण्याच्या तयारीत तो असतो. बैल जसा जवळ येतो तसा तो हल्ला करणार तोच… हे वाचा - Shocking! भुकेल्या आईने आपल्या पिल्लालाच खाल्लं; काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक VIDEO तुम्हाला वाटेल की वाघाने बैलावर अटॅक केला असेल पण प्रत्यक्षात मात्र उलटच घडलं. बैल धावत आला त्याचीही जर शिकारीसाठी उभ्या असलेल्या वाघावर पडली. पण बैलही तसा चवताळलेलाच दिसत होता. त्यामुळे तो काही वाघाला पाहून घाबरला नाही की मागे पळाला नाही. उलट वाघाच्या दिशेने तो पळत आला. जसा वाघ त्याच्यावर हल्ला करणार तसं उलट बैलच त्याच्या दिशेने पळत गेला.
Courage is found in unlikely places…
— Susanta Nanda (@susantananda3) August 30, 2022
Bull scares away the tiger. This is not the behaviour apex predator that we know. Pressure of human presence is perhaps having a huge role.
WA fwd pic.twitter.com/6A4kx39yVc
शिकार करायला आलेला वाघही बैलाचं रूप पाहून घाबरला. तो आल्या पावली पुन्हा मागे पळत गेला. त्यानंतर बैलही तिथून पळत सुटला. वाघ मात्र त्या पळणाऱ्या बैलाकडे एकटक पाहत राहिला. थोड्या वेळाने तो रस्त्यावर आला आणि रस्ता पार करू रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. हे वाचा - ‘तो’ एकटा आणि चारही बाजूंनी विषारी सापांनी घेरलं; जगातील सर्वात खतरनाक Snake Rescue Video आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अशक्य ठिकाणी हिंमत असते. बैलाने वाघाला घाबरवून पळवून लावलं. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.