जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! इशाऱ्यावर नाचता नाचता अस्वलाने ट्रेनरसोबत केलं धक्कादायक कृत्य; Shocking Video

बापरे! इशाऱ्यावर नाचता नाचता अस्वलाने ट्रेनरसोबत केलं धक्कादायक कृत्य; Shocking Video

अस्वलाचा ट्रेनरवर हल्ला.

अस्वलाचा ट्रेनरवर हल्ला.

इशाऱ्यावर नाचवणाऱ्या ट्रेनरलाच अस्वलाने धरून जमिनीवर पाडलं आणि त्याच्या छातीवर बसलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 सप्टेंबर : प्रत्यक्षात तुम्ही सर्कस पाहिलंच असेल. प्रत्यक्षात नाही तर किमान फिल्ममध्ये किंवा सर्कसचे व्हिडीओ पाहिले असतील. सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ दाखण्यास बंदी असली तरी अद्यापही काही ठिकाणी तसं केलं जातं. प्राण्यांसोबत खेळ हा त्यांचा छळ आहेच पण हे माणसांसाठीही जीवघेणं ठरू शकतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका अस्वलाने ट्रेनरवर खतरनाक हल्ला केला आहे. अस्वल शरीराने अवाढव्य असलं तरी वाघ-सिंहाची भीती वाटावी तितकी अनेकांना त्याची भीती वाटत नाही. पण क्युट दिसणारं अस्वलही किती खतरनाक असू सकतं, हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल. त्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या ट्रेनरलाही त्याने सोडलं नाही. अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी ट्रेनर धडपड करत राहिला. व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला अस्वल एक ट्रॉली घेऊन जाताना दिसतं. समोर ट्रेनर उभा आहे, त्याच्यापर्यंत ते ट्रॉली नेतं. त्यानंतर ती व्यक्ती अस्वलाला हात दाखवून थांबायला सांगते तेव्हा अस्वल थांबतं. ज्या दिशेनं अस्वल आलं त्या दिशेने व्यक्ती जाते. त्यावेळी त्याच्या इशाऱ्यावर नाचणारा अस्वलही त्याच्या मागे मागे जातो. ती व्यक्ती अस्वलाच्या तोंडात काहीतरी टाकते. त्यानंतर अस्वल चवताळतो. तो त्या ट्रेनरलाच धक्का देऊन खाली पाडतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. त्याने त्याची मान आपल्या जबड्यात धरल्याचंही दिसतं. हे वाचा -  क्षणात उलटला शिकारीचा डाव! शिकार करायला आलेल्या वाघालाच बैलाने…; WATCH VIDEO ट्रेनर अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत असतो. तिथंच असलेला दुसरा ट्रेनरही त्याच्या मदतीसाठी धावून येतो. तो अस्वलाला लाथा मारताना दिसतो. पण अस्वल काही बाजूला हटत नाही.

जाहिरात

ज्या सर्कसमध्ये काही वेळापूर्वी हशा पिकला होता, तिथंच लोकांच्या किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. आतापर्यंत मनोरंजन करणाऱ्या अस्वलाचं हिंसक रूप पाहून सर्वजण घाबरले आणि ओरडू लागले. हे वाचा -  बाबो! एका नागिणीसाठी आपसात भिडले 2 विषारी साप; शेवट असा झाला की… Watch Video @earth.reel इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून लोकांना धडकी भरली आहे. काही युझर्सनी प्राण्यांसोबत केल्या जाणाऱ्या या छळाबाबत संतापही व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात