मुंबई, 03 सप्टेंबर : कुणालाही कारणाशिवाय त्रास देऊ नये, असं सांगितलं जातं. पण तरी काही लोक मुक्या जीवांना त्रास देत असतात. मुक्या जीवांचा खेळ करत असतात. बऱ्याचदा लहान मुलं अशा प्राण्यांसोबत खेळण्याच्या नावाने नकळतपणे त्यांना त्रास देत असतात. त्यांचं वय पाहता आपण या प्राण्यांसोबत नेमकं काय करतो आहे, त्यांनाही त्रास होतो आहे, वेदना होत आहेत, याची कल्पना त्यांना नसते. मजा किंवा खेळ म्हणून ते प्राण्यांसोबत असं काही करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात काही मुलं कुत्र्याला मारायला गेली आणि ऑन द स्पॉट त्यांच्यासोबत असं काही घडलं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. कुत्र्याला मारणाऱ्या मुलांच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक श्वान जिन्यावरून धावत येताना दिसतो. खाली काही मुलं आहेत, जी हातात काठी घेऊन उभी आहेत. ती या कुत्र्याला मारण्याच्या तयारीत आहेत. कुत्रा बिचारा त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. हा कुत्रा एका मुलासमोर जाताच तो मुलगा हातात काठी धरून त्याच्या शरीरात जितका जोर आहे तितका काढून या श्वानावर काठी मारायला जातो तोच… हे वाचा - प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात पाणी आणणारा Video; क्षणात उद्धवस्त झालं हजारो जिवांचं घरं मुलगा काठीचा नेम कुत्र्यावर धरतो. पण ज्या काठीने तो त्याला मारायला जातो ती काठी त्यालाच बसते. जशी तो काठी कुत्र्याच्या दिशेने मारतो तशी ती त्याच्या हातातून सुटतो आणि गरागरा फिरून त्याच्याच पाठीवर बसते. काठी इतक्या जोरात लागते की मुलगा कळवळतो. त्याच्या पाठीत वेदना होता पाठीला हात लावतच तो खाली बसतो.
For trying to hit a dog pic.twitter.com/XzISo7rnjV
— Klip Entertainment (@klip_ent) August 31, 2022
मुक्या जीवाला मारण्याची मुलाला लगेच शिक्षा मिळाली. त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं. कुणालाही कारणाशिवाय त्रास देण्याचा काय परिणाम होऊ शकतो हे कदाचित या मुलाला समजलं असावं. त्यामुळे या पुढे तो कोणत्याच जीवाला त्रास देण्याची हिंमत करणार नाही. हे वाचा - जगातील असं रहस्यमय ब्रिज, ज्यावर जाताच आत्महत्या करतात कुत्रे, वाचा संपूर्ण माहिती Instant Karma ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. फक्त 12 सेकंदाचा हा व्हिडीओआहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. मुक्या जीवाला मारणाऱ्या मुलासोबत असंच व्हाययला हवं अशी प्रतिक्रिया बऱ्याच युझर्सनी दिली आहे. तर काहींनी मुलाला फार लागलं नसावं अशी आशा व्यक्त केली आहे.