• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मगर आणि शार्कनं एकत्र लुटला नदीत पोहण्याचा आनंद, पाहा दुर्मीळ VIDEO

मगर आणि शार्कनं एकत्र लुटला नदीत पोहण्याचा आनंद, पाहा दुर्मीळ VIDEO

प्राण्याच्या जगातील अद्भुत गोष्टी पाहताना अनेकदा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा व्हिडिओ पाहूनही असेच वाटेल.

 • Share this:
  मुंबई, 27 मार्च : समुद्रातील जलचरांचं जग हे कायमच चित्रविचित्र गोष्टींनी भरलेलं असतं. यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. भीतीनं धडकी भरवणाऱ्या, अंगावर शहारे आणणाऱ्या किंवा एकाएकी आनंदाचे रोमांच उभे करणाऱ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला येत असतात. (viral video) आताही याबाबतचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दोन प्राणी एकत्र समुद्रात पोहताना दिसत आहेत. हे दोन प्राणी म्हणजे मगर आणि शार्क. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. हे दोघे मजेत एकत्र पोहताना यात दिसतात. (Shark and Alligator swim together) हा व्हिडिओ शेअर केला आहे फ्लोरिडा इथल्या ग्रे विंसन यांनी. व्हिडिओ पाहताच अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावत आहेत. या व्हिडिओत एक बुल शार्क आणि एक मगर एकत्र पोहत आहेत.
  It’s not everyday you see a bull shark and a gator swimming together in the Indian river.. I’m not so sure how the manatee made out.😳 Posted by Gray Vinson on Sunday, March 21, 2021
  ग्रे विन्सन यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'तुम्ही रोज रोज शार्क आणि मगरीला एकत्र पोहताना पाहू शकत नाही.' (shark and alligator swimming viral video) सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर लोकांना तो खूपच आवडतो आहेत. हेही वाचा - क्या बात है! लाकडावर पाय ठेवताच तयार होणार वीज भरभरून शेअर करण्यासह लोक यावर विविध कमेंट्सही करत आहेत. ग्रे म्हणता, 'बुल शार्क आणि मगर माझ्या मते पहिल्यांदाच एकत्र पोहत आहेत. याआधी कधी कुणी त्यांना असं पाहिलेलं नाही.' (rare video of shark and alligator in river) हेही वाचा रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आपटला पक्षी; पुढे काय झालं पाहा VIDEO सोशल मीडियावर जेव्हा केव्हा अशा पोस्ट आणि अनोखे व्हिडिओज पोस्ट केले जातात, लोक त्यांना लगोलग उचलून धरतात. कारण अशी दृश्यं खरोखर खूप दुर्मिळ असतात. पक्षी प्राण्यांच्या अद्भुत जगाची झलक अशा व्हिडिओजमधून पहायला मिळते.
  Published by:News18 Desk
  First published: