• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अरे बापरे! रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आपटला पक्षी; पुढे काय झालं पाहा VIDEO

अरे बापरे! रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आपटला पक्षी; पुढे काय झालं पाहा VIDEO

आनंदात, उत्साहात असलेला हा तरुण अगदी घाबरून जातो, कावराबावरा होतो.

 • Share this:
  मुंबई, 26 मार्च : हवेत उंच उडायला प्रत्येकाला आवडतं. पूर्वी हवेत उंचावर जाण्यासाठी फक्त झोपाळे होते पण आता बऱ्याच अशा राइड उपलब्ध झाल्या आहेत. ज्या अगदी गगनचुंबी असतात. त्यामुळे पक्ष्यासारखं आकाशात उडाल्याचाच जणू आनंद मिळतो. अशाच राइडचा आनंद लुटता लुटता एका व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. दोन व्यक्ती रोलर कोस्टर राइडचा आनंद लुटत होते. जमिनीपासून आकाशात उंच जाण्याचा अनुभव घेत होते. त्याचवेळी एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक पक्षी येऊन आपटतो. त्यानंतर पुढे काय होतं ते तुम्हीच पाहा. व्हिडीओत पाहू शकता दोन्ही तरुण आकाशाच्या अगदी जवळ गेल्यानंतर अति उत्साही दिसत आहे. तितक्यात एका तरुणाच्या चेहऱ्यावर काहीतरी आपटतं. त्याला काही वेळ कळत नाही की नेमकं काय झालं आहे. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. आनंदात, उत्साहात असलेला हा तरुण अगदी घाबरून जातो, कावराबावरा होतो. हे वाचा - लय भारी! टिकटॉक....टिकटॉक... मॉडेल्सनाही मागे टाकेल असा कावळ्याचा कॅटवॉक तोंडावर काहीतरी आल्यासारखं वाटतं म्हणून तो तोंडावरून हात फिरवतो. त्यावेळी मानेजवळ काहीतरी असल्यासारखं वाटतं. मानेला हात लावतो तर तिथं चक्क एक पक्षी. हा पक्षी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपटून मानेवर जातो आणि काही वेळ तिथंच बसून राहतो. जेव्हा त्या व्यक्तीचा हात आपल्या मानेजवळ जातो, तेव्हा पक्षी त्याच्या हातातून निसटून भुर्रकन उडून जातो. ही व्यक्ती त्याच्याकडे पाहतच राहते. हे आपल्यासोबत काय झालं हे त्याला समजतच नसतं. थोडी ती धक्क्यातच दिसते. हे वाचा - बोटीतून पक्ष्याला देत होता खाणं; समुद्रातून आला भलामोठा मासा आणि... धडकी भरवणारा VIDEO @RexChapman यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. अवघ्या सात सेकंदाचा हा व्हिडओ आहे. पण व्हिडीओ पाहताच त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. विशेषतः त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील विचित्र हावभाव पाहूनच हसू फुटतं. लोक त्याची चांगलीच मजा घेत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: