Home /News /lifestyle /

क्या बात है! लाकडावर पाय ठेवताच तयार होणार वीज

क्या बात है! लाकडावर पाय ठेवताच तयार होणार वीज

सध्या वॉकसाठी घराबाहेर पडण्याची भीती वाटत असेल तर, आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत किंवा एखाद्या रुममध्ये देखील वॉक(Walk)घेऊ शकता. दिवसातून किमान 20 मिनटं ते 1 तास चालणं आवश्यक आहे.

सध्या वॉकसाठी घराबाहेर पडण्याची भीती वाटत असेल तर, आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत किंवा एखाद्या रुममध्ये देखील वॉक(Walk)घेऊ शकता. दिवसातून किमान 20 मिनटं ते 1 तास चालणं आवश्यक आहे.

फार कष्ट न घेता तुम्हीसुद्धा घरच्या घरी वीज निर्मिती करू शकता.

    मुंबई, 26 मार्च : लाकूड हे विजेचं सुवाहक (Conductor) की दुर्वाहक (Non-Conductor) असं विचारलं तर चटकन तुमच्या तोंडून उत्तर येईल की दुर्वाहक. म्हणूनच आपण विजेसंबंधी काम करताना लाकडी स्टूल किंवा वस्तू पायांखाली घेतो. पण याच लाकडावर प्रक्रिया करून असं लाकूड तयार केलं गेलं आहे की ज्यावर दाब पडला किंवा आपण चाललो तरीही त्या लाकडातून विजेची निर्मिती करता येईल. लाकडातल्या पिझोइलेक्ट्रिक गुणधर्मामुळे (piezoelectric properties) लाकडावर पडणाऱ्या दबावाचं इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेत रूपांतर करता येतं. त्यासाठी लाकडातील हा नैसर्गिक गुणधर्म अधिक वाढवण्यासाठी स्वित्झर्लंडमधील शास्रज्ञ प्रयोग करत आहेत. लाकूड जितकं मऊ होईल तितका हा गुणधर्म वाढतो. जेव्हा हे लाकूड घरातील फरशांच्या जागी जमीन म्हणून वापरलं जाईल तेव्हा फक्त त्यावरून चाललं की घरातल्या घरातच वीज निर्माण होईल. द स्विस फेडरल लॅबरोटरीज फॉर मटेरियल्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी (EMPA) आणि ETA झुरिच यांनी पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंपासून वीज तयार करणारी यंत्रणा डिझाइन केली आहे. अगदीच स्पष्ट सांगायचं तर लाकडापासून वीज तयार करण्याचं तंत्र त्यांनी विकसित केल्याचं सायन्स अडव्हान्सेस या मासिकातल्या वृत्तात म्हटलं आहे. हे वाचा - काय म्हणताय! 'चलते चलते' मिळणार वीज; रस्त्यावर फक्त चालण्याने ऊर्जा निर्मिती आपल्या पिझोइलेक्ट्रिक गुणधर्मामुळे लाकूड मेकॅनिकल एनर्जीचं थेट विजेत रूपांतर करतं असा सिद्धांत आहे. पण या सिद्धांताचा वापर या आधी फारसा झाला नव्हता. पण कच्च्या किंवा विनाप्रक्रिया लाकडापासून तुलनेने पिझोइलेक्ट्रिक वीज कमी प्रमाणात मिळते. हे लाकूड अधिक लवचिक केलं तर ही वीज निर्मिती (Electricity Generation) क्षमता वाढवता येते. शास्रज्ञांनी हायड्रोजन पेरॉक्साइड आणि असेटिक अॅसिड वापरून बासला लाकडावर निसर्गपूरक प्रक्रिया करून ते अधिक लवचिक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचं पिझोइलेक्ट्रिक आउटपुट 55 पर्यंत नेलं. लाकडात घडणारी वैज्ञानिक प्रक्रिया म्हणायचं झालं तर जेव्हा लाकडी जमिनीवर मोठा दाब दिला जातो त्यामुळे लाकडाचं डिफॉर्मेशन होतं त्यातून इलेक्ट्रिक व्होल्टेज निर्माण होतं. सध्याच्या घडीला लॅबमधील संशोधनात लाकडाच्या लहान पृष्ठभागांवरच प्रयोग केले जात आहेत. 15mm लांबीच्या चौकोनी लाकडी पृष्ठभागावर प्रयोग केल्यावर अधिकाधिक 0.87 व्होल्ट इतकं व्होल्टेज निर्माण केलं जाऊ शकतं असं प्रयोगाअंती सिद्ध झालं आहे. भविष्यात अशा प्रकारचं बांधकामाचं साहित्य किंवा लाकडी फरशी तयार करता येतील ज्यांच्या माध्यमातून वीज निर्माण करता येईल असा शास्रज्ञांना विश्वास आहे. हे वाचा - मी इथं का बरं आलो होतो? तुम्हालाही त्या क्षणी काही आठवत नाही का? लाकडी फरशीवर चालून वीज निर्माण करण्याची कल्पना काही नवी नाही. लंडनमध्ये पॉवरजनरेशनशी संबंधित एका स्टार्टअपने पदचाऱ्यांच्या पावलांमुळे निर्माण होणाऱ्या कायनेटिक एनर्जीतून वीज निर्माण करण्याचं तंत्र विकसित केलं आहे. ही यंत्रणा थेट रस्त्याशी जोडण्यात आली आहे आणि आता तुम्ही तुमच्या घराची फरशी लाकडी असेल तर तुम्हीही वीज निर्माण करू शकाल.
    First published:

    Tags: Electrical wire, Electricity, Lifestyle, Tech news, Technology

    पुढील बातम्या