जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - गरगर...गरगर... एका शिंगावर फिरवला टब; म्हशीचं स्टंट पाहून व्हाल थक्क

VIDEO - गरगर...गरगर... एका शिंगावर फिरवला टब; म्हशीचं स्टंट पाहून व्हाल थक्क

VIDEO - गरगर...गरगर... एका शिंगावर फिरवला टब; म्हशीचं स्टंट पाहून व्हाल थक्क

माणसाप्रमाणे म्हशीनेही दाखवलं आपलं टॅलेंट.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 सप्टेंबर :  ‘अक्ल बड़ी या भैंस’ असं आपण बोलबोलण्यात बोलून जातो. प्रत्येक जण या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं देतं तर काही जण यात कन्फ्युझ होतात. अखेर माणसांच्या या प्रश्नांना खुद्द म्हशीनंच (Buffalo) उत्तर दिलं आहे. म्हशीने अशी करामत करून दाखवली आहे, की त्यातूनच तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तरंही मिळेल. म्हशीचा हा व्हिडीओ (Buffalo Video) सध्या सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. एरवी एका बोटावर बॉल, प्लेट फिरवताना तुम्ही माणसांना पाहिलं आहे. पण कधी कोणत्या प्राण्यांना असं करताना पाहिलं आहे का? खरंतर असं सांगितलं तरी आपल्याला हसू येईल. पण आपण ज्याचा विचारही करू शकत नाही ते या म्हशीने ते करून दाखवलं आहे. म्हशीने चक्क आपल्या एका शिंगावर गरगर टब फिरवला आहे (Tub on buffalo horn).

जाहिरात

म्हशीचा हा व्हिडीओ पाहन सर्वजण सर्वजण थक्क झाले आहेत. म्हैससुद्धा असंकाही करू शकते, हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनसुद्धा आपल्याला विश्वास बसत नाही. हे वाचा -  अक्ल बड़ी या भैंस? माणसांच्या प्रश्नांना अखेर म्हशीनंच दिलं उत्तर; पाहा हा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एका म्हशीला एका खुंट्याला बांधण्यात आलं आहे, ती तिथं शांतपणे बसली आहे. रवंथ करताना दिसते आहेत. तिच्या शिंगात एक प्लॅस्टिक टब आहे. फक्त एकाच शिंगावर हा टब आहे आणि म्हैस तो गरगर फिरवताना दिसते आहे. यावेळी तिच्या शिंगातून टब बिलकुल खाली पडत नाही. बराच वेळ म्हैस एकाच शिंगावर टब असाच गरगर फिरवते आणि थोड्या वेळाने ती आपल्या मानेला मोठा झटका देते. त्यावेळी मात्र टब खाली परतो. कदाचित हा टब म्हशीच्या शिंगात अडकला असावा आणि ती तो काढण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ती मान हलवते. पण टब तिच्या शिंगात अडकलेला आहे आणि तो शिंगातून निघण्याऐवजी फक्त गोलगोल फिरतो आहे. पण तरी हे दृश्य पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. जणू म्हैस स्टंटच करते आहे, असं दिसतं. हे वाचा -  काय हे प्रेम! एकमेकींना कडकडून मिठी मारताना दिसल्या 2 मांजरी; पाहा Cute Video @Dogratishaa ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आमच्या देशात म्हशीसुद्धा कलाकार आहेत, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सहीसुद्धा म्हशीच्या टॅलेंटला दाद दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात