मराठी बातम्या /बातम्या /Viral /जेव्हा आपसात भिडले सिंहिण आणि म्हैस; पाहा कोण ठरलं वरचढ, भांडणाचा Live Video

जेव्हा आपसात भिडले सिंहिण आणि म्हैस; पाहा कोण ठरलं वरचढ, भांडणाचा Live Video

म्हशीवर हल्ला करता यावा म्हणून सिंहिण घात घालून बसली आहे. सिंहिण झुडपात लपलेली असते. मात्र म्हैस चालायला लागताच तिला ही सिंहिण दिसते

म्हशीवर हल्ला करता यावा म्हणून सिंहिण घात घालून बसली आहे. सिंहिण झुडपात लपलेली असते. मात्र म्हैस चालायला लागताच तिला ही सिंहिण दिसते

म्हशीवर हल्ला करता यावा म्हणून सिंहिण घात घालून बसली आहे. सिंहिण झुडपात लपलेली असते. मात्र म्हैस चालायला लागताच तिला ही सिंहिण दिसते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 27 मार्च : सिंहीणीशी कोणालाच पंगा घेण्याची इच्छा नसते. कारण ती हिंस्र असते, की एकदा तिने आपल्या शिकारीला आपल्या तावडीत अडकवलं की मग त्यातून सुटणं अवघडच नाही तर अशक्य होतं. मात्र, काही वेळा सिंहिणीलाही पराभूत व्हावं लागतं. विश्वास बसत नसेल तर युट्यूबवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. यात म्हशीने अशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं की, सिंहिणीलाही पळ काढावा लागला. पण शेवटी अनेक सिंहिणी हल्ला करण्यासाठी येत असल्याचं पाहून म्हैसही तिथून धूम ठोकताना दिसते.

दोन विशालकाय हत्तींचं खतरनाक भांडण; धक्क्याने भलंमोठं झाडंही कोसळलं, पाहा काय झाला शेवट..VIDEO

हा व्हिडिओ Masai Sightings नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहताच व्हायरल झाला. एक मिनिटापेक्षा जास्त कालावधीच्या या व्हिडिओमध्ये एक म्हैस जंगलात फिरत असल्याचं तुम्ही पाहू शकता. सिंहीण तिचा पाठलाग करत आहे, याची तिला कल्पना नसते. म्हशीवर हल्ला करता यावा म्हणून सिंहिण घात घालून बसली आहे. सिंहिण झुडपात लपलेली असते. मात्र म्हैस चालायला लागताच तिला ही सिंहिण दिसते. यानंतर म्हैसच सिंहिणीवर हल्ला करण्यासाठी धावू लागते. हे पाहून सिंहिण पळ काढते. .

" isDesktop="true" id="856225" >

यानंतर आणखी एक सिंहिण तिथे येते आणि म्हशीवर हल्ला करू लागते. हे पाहून म्हैसही तिथून पळ काढण्यातच आपलं भलं मानते. तज्ज्ञांच्या मते, म्हशींची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता खूपच कमकुवत असते. परंतु आफ्रिकन म्हशींमध्ये वास घेण्याची क्षमता खूप जास्त असते. 50 मीटर अंतरावरून ते कोणाचाही वास चांगला अनुभवू शकतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सिंहीण म्हशीच्या अगदी जवळ जाण्यात यशस्वी झाली पण म्हशीने प्रत्युत्तर दिल्यावर ती पळून गेली. खरं तर, सिंहीण म्हशीच्या आकारामुळे घाबरली.

हा व्हिडिओ आत्तापर्यंत सुमारे दोन लाख वेळा पाहिला गेला आहे. जवळपास एक हजार लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, म्हशीला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही, ती खूप मोठी आहे. दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिलं, ती आठवण करून देत आहे, की सर्वात शक्तिशाली प्राण्यांनीदेखील नेहमी सतर्क असलं पाहिजे. संकट कधी आणि कुठून येईल हे सांगता येत नाही.

First published:
top videos

    Tags: Lion, Shocking viral video, Wild animal