नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील सर्वात घातक प्राणी मानले जातात. हे प्राणी डोळ्याची पाणी मिटण्याच्या आत शिकार करतात. यांच्या तावडीतून सुटणं जवळपास सगळ्याच प्राण्यांसाठी अशक्य असतं. कारण शक्तीसोबतच त्यांच्यात तितकाच चपळपणाही असतो. सध्या एका बिबट्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video of Leopard) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
आपल्या सर्वांना माहिती आहे की जंगलातील जग अतिशय वेगळं असतं. इथे प्रत्येक प्राण्याला सतत सावध राहावं लागतं. कारण इथे प्रत्येक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात दिसतं की एका बिबट्याने हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्यावर हल्ला (Leopard Attack on Deer) केला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हरण तलावातील पाण्यात अतिशय आरामात उभा आहे. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की त्याला आपल्या आसपास असलेल्या धोक्याची चाहूल लागलेली आहे. याच कारणामुळे ते एकटक आपल्या आजूबाजूला पाहत आहे. इतक्यात एक बिबट्या झाडीतून बाहेर येतो आणि हरणावर हल्ला करतो. यानंतर हरण आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतं.
Danger often comes from the most unexpected quarters. Remain alert, Always !!#SMForward @susantananda3 pic.twitter.com/QD8rKVEaeR
— Saket (@Saket_Badola) November 8, 2021
हा हैराण करणारा व्हिडिओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी साकेस बडोला यांनी आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कॅप्शन दिलं, की धोका कधीही आणि कुठेही असू शकतो. त्यामुळे नेहमी सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका यूजरनं म्हटलं, की हा व्हिडिओ पाहून माझ्या अंगावर काटा आला. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मला वाटतंय की बिबट्याने हरणाची शिकार केलीच असेल. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.