मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत पोहोचले राज्यपालांच्या भेटीला, 'हे' आहे कारण

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत पोहोचले राज्यपालांच्या भेटीला, 'हे' आहे कारण

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत राजभवनावर पोहोचले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत राजभवनावर पोहोचले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत राजभवनावर पोहोचले आहे.

मुंबई, 08 नोव्हेंबर : राज्यपाल (bhagat singh koshyari) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) वाद सर्वश्रुत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत एकदाही टीकेची संधी सोडली नाही. पण, आज सर्व वाद बाजूला ठेवून संजय राऊत राजभवनावर (rajbhavan) दाखल झाले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत राजभवनावर पोहोचले आहे. संजय राऊत यांची मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज्यपालांच्या भेटीला पोहोचले आहे. लग्न पत्रिकेच्या निमित्ताने राऊत आणि राज्यपालांची भेट होत आहे. याआधी संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी भेटीसाठी पोहोचले होते. शरद पवार यांनाही मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली. त्यानंतर राऊत राजभवनाकडे रवाना झाले.

800 वर्षे जुन्या किल्ल्यात कतरिना-विकी बांधणार लग्नगाठ! पाहा Inside Photo

संजय राऊत यांची मुलगी पूर्वेशीचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपूत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी 31 जानेवारी रोजी साखरपुडा संपन्न झाला होता. पूर्वेशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांचा मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये छोटेखानी समारंभात साखरपुडा पार पडला होता. यावेळी संपूर्ण राऊत कुटुंब हजर होतं. तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

मुलांपेक्षा ती कुत्र्यावर जास्त प्रेम करते; पतीनं अजब समस्या सांगत मागितला सल्ला

संजय राऊत यांचे व्याही हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आहे. राजेश नार्वेकर हे अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी याआधी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काम केले आहे. तसंच 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून सुद्धा काम पाहिले होते.

First published:
top videos