कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार उडाला आहे. या काळात अनेक असे फोटो व्हायरल झाले ज्यामुळे डोळ्यात पाणीही आलं आणि काही समाधानही देणारे आहेत. सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक मांजरीन तिच्या पिल्लाला तोंडात धरून दवाखान्यात पोहोचल्याचं दिसत आहे. तुर्कीमधील इस्तांबुल इथला हा फोटो आहे. यामध्ये मांजरीनीचा आणि पिल्लाचा फोटो ट्विटरवर शेअर केला जात आहे. मांजरीन तिच्या पिल्लाला घेऊन रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱीही आश्चर्यचकीत झाले. एका युजरनं म्हटलं आहे की, आम्ही इमर्जन्सी रूममध्ये असताना एक मांजरीन पिल्लाला तोंडात धरून समोर आली. तिथल्या स्टाफने मांजरीनीला खायला दिलं. त्यानंतर दुधही दिलं. तिच्या पिल्लाला उपचारासाठी स्टाफ घेऊन जातो.