वुहान, 02 मे : चीनच्या वुहान शहरातून जगभर कोरोना व्हायरस वेगानं संक्रमित होत गेला. जगभरात या व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. हा व्हायरस पसरण्याचं कारण म्हणजे तिथल्या लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी जबाबदार असल्याचा दावा केला जात आहे. वटवाघूळ खाल्लायनं तर काही जणांच्या मते माशांमधून हा व्हायरस पसरल्याचा दावे-प्रतिदावे केले जात आहे. जगभरात कोरोनामुळे भीतीचं वातावरण असतानाच आणखीन एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चीनमधील जियांगसू भागातील हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. एका तरुणाच्या एक्सरेचा हा फोटो आहे. या तरुणाला काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानं डॉक्टरांना दाखवलं मात्र तरीही फरक न पडल्यानं एक्सरे काढण्यास सांगितला. या तरुणाच्या फुफ्फुसाच्या एक्सरेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्का बसला आहे. या एक्सरेमध्ये चक्क फुफ्फुसात किडे असल्याचं दिसलं आणि डॉक्टरही चाट पडले. हा संपूर्ण प्रकार काय हे त्यांनाही कळलं नाही. त्यानी तरुणाची चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. हे वाचा- ट्रम्प यांनी निभावलं मैत्रीचं नातं! अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांना मोठी सूट
डेली मेल नं दिलेल्या वृत्तानुसार या तरुणानं कच्चा साप खाल्ला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचं लक्षात आलं. सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Paragonimiasis नावाचा आजार या तरुणाला झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हा आजार कच्च मांस खाल्ल्यानं किंवा गढूळ पाणी प्यायल्यानं होतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे या तरुणाच्या फुफ्फुसात किडे पडल्याचं डॉक्टर सांगतात. सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत. हे वाचा- लॉकडाऊनमध्ये अडवलं म्हणून पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO