लखनऊ, 16 नोव्हेंबर : लग्न, पती-पत्नी यांचे किस्से तुम्ही बरेच ऐकले असतील. सोशल मीडियावर असे व्हिडीओही व्हायरल होत असतात. पण सध्या असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. हनीमूनच्या रात्रीच नवरीबाईला पाहून नवरदेव हादरला. यानंतर तिच्याबाबत असं धक्कादायक सत्य समजलं की त्याची झोपच उडाली. सलग 5 दिवस तो झोपला नाही. उत्तर प्रदेशमधील एका कुटुंबाला लग्नानंतर जबरदस्त मोठा झटका बसला आहे.
उत्तर प्रदेशच्या जैथरामध्ये राहणारा तरुण दिल्लीतील एका तरुणीसोबत त्याचं लग्न ठरलं. 3 मे रोजी त्यांचं लग्न झालं. दिल्लीला वरात गेली आणि वाजतगाजत नवरीला घेऊन यूपीला आली. लग्नाच्या सर्व विधी झाल्यानंतर हनीमूनची वेळ आली.
लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाने नवरीसोबत बोलण्याचा आणि रोमान्स करण्याचा प्रयत्न केला. पण नवरीने शारीरिक संबंधाला नकार दिला. नवरदेवाने त्यादिवशी काही जबरदस्ती केली नाही. दुसऱ्या दिवशी नवरदेवाने नवरीसोबत पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पण तेव्हाही नवरी तयार झाली नाही. यानंतर नवरी स्वतःच आपल्याबाबत असं सत्य सांगितलं की नवरदेव पुरता हादरला.
हे वाचा - लग्नापूर्वी नववधू गुपचुप करत होती अशी गोष्ट, संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद...
लग्नाच्या तिसऱ्या रात्री नवरीने नवरदेवाला आपण किन्नर असल्याचं सांगितलं. जेव्हा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मुलीच्या कुटुंबाने मुलाच्या कुटुंबाला काहीच सांगितलं नाही. मुलगाही लग्नाला तयार झाला त्यामुळे लग्न झालं. पण तिसऱ्या दिवशी हे सत्य समोर आलं. पण समाज काय म्हणेल म्हणून तो शांत होता. जेव्हा नवरदेवाला आपली नवरी किन्नर आहे हे समजलं त्यानंतर तो पाच दिवस झोपू शकला नाही. सहाव्या दिवशी तर आणखी धक्कादायक घडलं. नवरदेवाच्या सासरची मंडळी आली लुटून फरार झाली. पाच दिवसांनंतर पत्नी, सासू-सासरे, मेहुणी दागिने आणि पैसे घेऊन फरार झाले. त्यांनी नवरदेवाच्या कुटुंबावर हल्लाही केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
हे वाचा - वरमाला घालताना असं काही घडलं की, ही जोडपी आयुष्यभर लक्षात ठेवतील, Watch Video
हिंदुस्थान लाइव्हच्या वृत्तानुसार या प्रकरणी पीडित कुटुंबाने जैथरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Marriage, Uttar pradesh, Viral, Viral news, Wedding