Home /News /viral /

स्टेजवर अचानक असं काही आठवलं की नवरीने मध्येच थांबवलं लग्न, कारण जाणून चक्रावून जाल

स्टेजवर अचानक असं काही आठवलं की नवरीने मध्येच थांबवलं लग्न, कारण जाणून चक्रावून जाल

एका डिजिटल कंटेंट प्रोड्युसर कंपनीच्या मालकिणीचं लग्न होत होतं. ती नवरीच्या पोशाखात लग्नासाठी उभा होती आणि संपूर्ण मंडप सजला होता.

    नवी दिल्ली 15 मे : तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर दररोज लग्नाचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ (Viral Wedding Videos) तुम्हाला इथे पाहायला मिळत असतील. लग्नसमारंभात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्या चर्चेचा विषय ठरतात. यात अनेकदा तर नवरी किंवा नवरदेवच असं काहीतरी करतात, ज्यामुळे त्यांचं लग्न फक्त पाहुण्यांमध्येच नाही तर जवळपास देशभरात चर्चेत राहातं. नुकतंच असंच एक प्रकरण दुबईतून समोर आलं आहे. यात वधूने लग्न सुरू असताना असं काही केलं, जे सर्वांनाच थक्क करणारं होतं (Bride Stops Marriage Rituals). वरात घेऊन निघाला मात्र रस्त्यातच केलं भलतंच कांड अन् थेट रुग्णालयात पोहोचला नवरदेव, नवरीने मोडलं लग्न ही घटना दुबईमधील एका मॅरेज हॉलमधली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका डिजिटल कंटेंट प्रोड्युसर कंपनीच्या मालकिणीचं इथे लग्न होत होतं. ती नवरीच्या पोशाखात लग्नासाठी उभा होती आणि संपूर्ण मंडप सजला होता. दरम्यान, तिला अचानक आठवलं की तिने आपला वेडिंग ड्रेस पूर्णपणे परिधान केलेला नाही. लग्न सुरू असताना अचानक तिला आठवलं की तिच्या लग्नाच्या गाऊनमध्ये एक अटॅचमेंट लावायची राहून गेली आहे. हे लक्षात येताच तिने जवळच उभा असलेल्या आपल्या मैत्रिणीला बोलावलं आणि यानंतर आपलं लग्न थांबवलं. तिथून कोणीतरी आत जाऊन तिचे कपडे आणले आणि मग वधूने ते परिधान केले. यादरम्यान वधूने लग्न थांबवलं आणि पूर्णपणे तयार झाल्यावर पुन्हा विवाहसोहळा सुरू झाला. Video: लग्नात वधूनं दिला धक्का, पण पाण्यात पडणारा नवरदेवही काही कमी करामती नव्हता नंतर या घटनेबद्दल बोलताना नवरीने सांगितलं की मला माईक हातात घ्यायचा होता आणि माझ्या लग्नाचे सुरू असलेले विधी थांबवायचे होते. यानंतर मला माझा ड्रेस व्यवस्थित परिधान करायचा होता. हे सगळं माझ्यासाठी कठीण होतं. मी कधीच विचार केला नव्हता की माझं लग्न कसं असेल, मात्र आता माझ्या लग्नाचा दिवस, आमच्यातील कोणीच सहज विसरणार नाही. त्यादिवशी माझ्या आनंदात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral news, Wedding couple

    पुढील बातम्या