मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

गोलगप्पा खाने का स्ट्रगल तुम क्या जानो गे...! नाकात नथ घालून पाणीपुरी खाण्यासाठी नवरीची धडपड

गोलगप्पा खाने का स्ट्रगल तुम क्या जानो गे...! नाकात नथ घालून पाणीपुरी खाण्यासाठी नवरीची धडपड

पाणीपुरी लव्हर नवरीचा (Bride eating panipuri) व्हि़डीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

पाणीपुरी लव्हर नवरीचा (Bride eating panipuri) व्हि़डीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

पाणीपुरी लव्हर नवरीचा (Bride eating panipuri) व्हि़डीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 26 जुलै : नवरी म्हटलं की नाकात नथ (Nath) आलीच. नाकातील नथ ओठांवर येत असते, अशावेळी  अनेक नवरींना तर बोलायलाही जमत नाही. मग खाताना तर त्यांचे वांदेच होतात (Wedding video). अशात जर नवरीचं फेव्हरेट फूड पाणीपुरी (Panipuri) असेल आणि ती तिच्यासमोर आली तर मग काय? सध्या अशाच पाणीपुरी लव्हर नवरीचा (Bride eating panipuri) व्हि़डीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

नथ घालून ही नवरी पाणीपुरी खाण्यासाठी धडपडणाऱ्या (Bride eating panipuri with nath) नवरीचा हा व्हिडीओ आहे. पाणीपुरी खाताना नथीचा नखरा आणि नवरीचा स्ट्रगल या व्हिडीओत दिसून येतो.

पाणीपुरी ही बहुतेक तरुणींची फेव्हरेट असते. मग ती पाणीपुरी कुठेही असो तरुणी त्यावर ताव मारतातच. मग ते आपलंच लग्न का असेना. अशाच पाणीपुरी लव्हर नवरीने आपल्या लग्नात पाणीपुरीवर ताव मारला. पण पाणीपुरी खाताना तिच्या नथीने नखरा केलाच. त्यावेळी तिची पाणीपुरी खाण्याासठी कशी धडपड सुरू होती ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

हे वाचा - OMG! फिरत्या पंख्यात महिलेने आपली जीभ टाकली आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

व्हिडीओत पाहू शकता ही बंगाली नवरी आहे. तिच्यासमोर पाणीपुरी दिसताच ती स्वतःला आवरू शकत नाही. ती पाणीपुरी खायला जाते. आता पाणीपुरी म्हटलं की एका हातात पाणीपुरी आणि दुसरा हात पाणीपुरीच्या खाली असं असतं. शिवाय त्यासाठी मोठं तोंड उघडावं लागतं. आता या नवरीच्या नाकात नथ आणि दोन्ही हातात धरलाय तो लग्नाचा जड असा ड्रेस. तिची पाणीपुरी खाताना पंचायतच झाली. मग  तिची मैत्रीण तिला पाणीपुरी खाण्यात मदत करताना दिसते आहे.

नवरीची मैत्रीण आपल्या हातात पाणीपुरी घेते आणि ती नवरीला भरवते. त्यावेळी नवरीच्या तोंडासमोर पाणीपुरी खाताना सर्वात मोठा अडथळा असतो तो नथीचा. नवरी आपल्या हाताने नथ वर करते आणि पाणीपुरी खाते. पाणीपुरी खाताच तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो आणि ती आपले दोन्ही हात वर करून डान्स करतानाही दिसते. असं करत करत ती पाणीपुरीवर चांगलाच ताव मारते.

हे वाचा - Dil toh baccha hain! लग्नातच नवरीची मस्ती; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

विटी वेडिंग इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका नवरीचा संघर्ष. ज्या नवरीला पाणीपुरी आवडते. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.  हा व्हिडीओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Bride, Bridegroom, Funny video, Viral, Wedding video