लाजणं दूर तोंडातून ऐटीत सोडला धूर; नवरीचं असं रूप पाहून नवऱ्यासह सासरची मंडळी गार

नवरीच्या तोंडातून निघणारा हा धूर नेमका आहे तरी कसला? तुम्हीच पाहा.

नवरीच्या तोंडातून निघणारा हा धूर नेमका आहे तरी कसला? तुम्हीच पाहा.

  • Share this:
    मुंबई, 18 जून : नवरी (Bride) म्हटलं की थोडं लाजणं आलंच. तसं सध्याच्या काळात मुली फार लाजत नाही. अगदी बिनधास्तपणे वावरतात. पण लग्नाचा क्षण असा असतो की आयुष्यभर बिनधास्तपणे वावरलेल्या मुलीही गोड लाजताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social media viral video) अशा नवरीचा (Bride video) व्हिडीओ व्हायरल (Bride viral video) होतो आहे, जी लाजणं तर दूर अगदी भरमांडवातच सर्वांसमोर तोंडातून ऐटीत धूर (Bride smoke) सोडतं आहे. तोंडातून धूर सोडणाऱ्या या नववधूची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. नववधूला असं तोंडातून धूर सोडताना पाहताच सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. नवरीचं असं रूप पाहून नवऱ्यासह सासरची मंडळीही गार झाली आहेत.
    व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी आणि दोघांचंही कुटुंबं एकत्र जेवायला बसले आहेत. तिथंच नवरी तोंडातून सर्वांसमोर धूर सोडताना दिसते आहे. तिचा नवरा तर तिला पाहतच राहतो. हे वाचा - खांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक असं पाहिलं तर कुणालाही वाटेल की हा सिगारेटचा धूर आहे. पण तिच्या हातात सिगारेट नाही आहे. मग हा धूर कुठला? व्हिडीओ नीट पाहिल्यावर त्या धुरामागील नेमकं सत्य समजतं. तिच्या तोंडात एक असा पदार्थ दिला जातो, ज्यातून धूर निघतो आहे. हा पदार्थ तोंडात घेतल्यानंतर नवरी तो धूर बाहेर असा फेकते, जसं काही ती स्मोकिंगच करते आहे. नवरीचं असं रूप पाहून नवरा आणि तिची सासरची मंडळीही पाहतच राहतात आणि तिला असं करताना पाहून हसू लागतात. हे वाचा - भरमंडपात दीराने नवरीसमोर केलं असं काही, थांबवावी लागले फेरे; नेमकं काय घडलं पाहा लग्न म्हटलं की त्यात अशी बरीच मजा-मस्ती आली. तशाच व्हिडीओपैकी हा एक आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published: