ट्रेंडिंग दुल्हनिया या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहून शकता, नवरा आणि नवरीचे फेरे सुरू आहेत. इतक्यात नवऱ्याचा छोटा भाऊ म्हणजे नवरीचा दीर तिथं येतो आणि फेरे घेतल असलेल्या नवरीसमोरच आडवा होता. नवरीच्या पायाजवळ तो आडवा होतो आणि त्या दोघांचाही मार्ग रोखतो. दीराचं हे कृत्य पाहून प्रत्येक जण हैराण होतो. हे वाचा - नवरी राहिली बाजूला मेहुणीने मारला चान्स; फोटो काढता काढता नवरदेवासोबत...; VIDEO पाहून तुम्हीही उडाल नवरीचा मार्ग अडवून तो आपल्या हाताने काहीतरी इशारे करताना दिसतो. तो नवरीकडे पैसे मागत असतो. दीराला असं पाहून नवरीलाही हसून आवरत नाही. ती खुदकन हसते, त्यानंतर मंडपातील इतर मंडळीही हसू लागतात. आपण आतापर्यंत फक्त नवरीची बहीण म्हणजे मेहुणीलाच नवऱ्याचे बूट चोरी करून त्याच्याकडे पैसे मागताना पाहिलं आहे. पण इथं नवऱ्याच्या भावाने म्हणजे नवरीच्या दीराने आपल्या वहिनीकडे पैसे मागितले आहेत. हे वाचा - VIDEO: नवरीच्या नातेवाईकानं लग्नात केली मस्करी, नवरदेवानं भरमंडपात केली धुलाई हा मजेशीर व्हिडीओ पंजाबी लग्नाचा असल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video