जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: लग्नाच्या स्टेजवरच जोडप्याचं भांडण; नवरीने सगळ्यांसमोर नवरदेवाला लगावली चापट

VIDEO: लग्नाच्या स्टेजवरच जोडप्याचं भांडण; नवरीने सगळ्यांसमोर नवरदेवाला लगावली चापट

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नवरी आणि नवरदेव एकमेकांना जबरदस्ती मिठाई खाऊ घालताना दिसतात. मात्र, यादरम्यान नवरीला अचानक राग येतो आणि यानंतर ती जे काही करते ते पाहून सगळेच थक्क होतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 11 जून : काळ बदलला तसं लग्नातील विविध विधी आणि परंपरांमध्येही थोडेफार बदल झाले. सुरुवातीच्या काळात वरमाळेचा कार्यक्रम फार जास्त प्रमाणात लग्नात पाहायला मिळत नसे. मात्र, आजकाल ही जणू एक फॅशनच झाली आहे. आता जवळपास सगळ्याच लग्नांमध्ये हा कार्यक्रम पाहायला मिळतो. यात नवरी आणि नवरदेव लग्नाच्या स्टेजवर एकमेकांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात आणि आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करतात. VIDEO: लग्नाच्या दिवशीही नवरदेव स्वतःच्याच नादात मग्न; मंडपात जे केलं ते पाहून खळखळून हसाल वरमाळेच्या कार्यक्रमात नवरी आणि नवरदेव अतिशय आनंदाने एकमेकांना फुलांचे हार घालतात आणि नंतर एकमेकांना मिठाईही खाऊ घालतात. मात्र आज सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Video) झाला आहे. यात नवरी आणि नवरदेव एकमेकांना जबरदस्ती मिठाई खाऊ घालताना दिसतात. मात्र, यादरम्यान नवरीला अचानक राग येतो आणि यानंतर ती जे काही करते ते पाहून सगळेच थक्क होतात.

जाहिरात

तुम्ही सोशल मीडियावर वरमाळेच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो अतिशय वेगळा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वरमाळेच्या कार्यक्रमानंतर आधी नवरीने नवरदेवाला जबरदस्ती मिठाई खाऊ घातली. यामुळे नवरदेव थोडा रागवला आणि त्यानेही नवरीला जबरदस्ती मिठाई खाऊ घालण्यास सुरुवात केली. मात्र या गोष्टीचा नवरीला इतका राग आला की तिने काहीही विचार न करता स्टेजवरच नवरदेवाला चापट मारली. नवरीचं हे रूप पाहून सगळेच हैराण झाले. 2 तरुणींच्या प्रेमात पडला तरुण; लग्नाआधीच झाला दोन मुलांचा बाप, अखेर घेतला मोठा निर्णय हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर asliashishmishra नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 2.3 मिलियन म्हणजेच 23 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 22 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, दोघांचे 36 गुण जुळत आहेत. तर आणखी एकाने लिहिलं की हे कसलं लग्न आहे, ज्यात आतापासूनच ही परिस्थिती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात