नवी दिल्ली 12 जानेवारी : लग्नाआधी वधू-वरांच्या घरात अनेक कामं सुरू असतात. बऱ्याचदा नवरदेवालाच घरातील या कामांमध्ये हातभार लावावा लागतो. मात्र, प्रत्येक घरात प्रयत्न केला जातो की, लग्नादरम्यान नवरदेवाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. वराला हळद लावल्यावर तो कुठेही बाहेर पडत नाही, पण अनुचित प्रकार कधी आणि कसे घडतील, हे कोणीच सांगू शकत नाही. संकट येणार असेल, तर ते कधीही आणि कुठेही येऊ शकतं. अशाच एका नवरदेवाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की लग्नाच्या आधी नवरदेवासोबत काहीतरी दुर्घटना घडते आणि त्याच्या पायात फ्रॅक्चर होतं.
अंगावरची हळद उतरण्याआधीच नववधूचं नवऱ्यासोबत धक्कादायक कृत्य
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की वरमालेच्या वेळी नवरदेव आपल्या वधूच्या समोर उभा आहे, परंतु त्याच्या पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे तो जास्त वेळ उभा राहू शकत नाही. मात्र, वधूने अशा वेळी काही अनोख्या पद्धतीने विधी पूर्ण केला. वराला उभा करण्याऐवजी तिने वराला सोफ्यावर बसवलं आणि त्याच प्रकारे वरमाला विधी पूर्ण केला.
यानंतर नवरी आपल्या गुडघ्यावर खाली बसली आणि सोफ्यावर बसलेल्या नवरदेवाने तिच्या गळ्यात वरमाला घातली. नवरी आणि नवरदेवाचं हे प्रेम बघून तिथे उपस्थित असलेले पाहुणेही भावुक झाले. यानंतर तिथे उपस्थित सगळेच टाळ्या वाजवू लागले. नवरीने नवरदेवासाठी केलेलं हे काम पाहून सगळ्यांनी तिचं कौतुक केलं.
View this post on Instagram
हा व्हिडिओ tiyasonkar नावाच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला गेला आहे. जो आतापर्यंत 83 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. तर 12 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. शेकडो लोकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की नवरीनं वचन देण्याआधीच पूर्णही केलं. तुम्ही दोघं नेहमी आनंदी राहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.