Home /News /viral /

मेहुण्यांनी रस्ता अडवून दिला त्रास; वैतागलेला नवरदेव छतावरच चढला आणि... काय घडलं पाहा VIDEO

मेहुण्यांनी रस्ता अडवून दिला त्रास; वैतागलेला नवरदेव छतावरच चढला आणि... काय घडलं पाहा VIDEO

नवरदेवाने असं काही केलं की पाहून सर्वजण थक्क झाले.

  मुंबई, 06 ऑक्टोबर : नवरदेवाला लग्नात सर्वात जास्त कोण त्रास देत असेल तर ती त्याची मेहुणी (Jija Sali). मग ही मेहुणी म्हणजे नवरीची बहीण असते किंवा तिची मैत्रीण (Jija Sali News). या मेहुण्या नवरदेवाला अक्षरश: हैराण करून सोडतात (Jija Saali Viral News). त्यांच्या बऱ्याच डिमांड असतात. काही नवरदेव या डिमांड पूर्ण करतात तर काही नवरदेव मात्र अगदी त्यांच्याप्रमाणेच इतके हट्टी असतात की मेहुण्यांची डिमांड पूर्ण न करताही ते आपला मार्ग बरोबर शोधतात (Jija saali viral video). सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. लग्नात काही विधी, परंपरा किंवा काही खेळ असतात. ज्यात मेहुण्या पुढाकार घेतात आणि त्या बदल्यात आपले दाजी म्हणजे नवरदेवाकडून शगुन म्हणून पैसे मागतात. अशाच पैशांची डिमांड करत काही मेहुण्यांनी नवरदेवाचा रस्ता अडवला. त्याला नवरीकडे जाण्यापासून रोखलं. त्यानंतर नवरदेव थेट छतावरच चढला. यानंतर नवरदेवाने जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले. हे वाचा - 'लग्नानंतर तू...', बोहल्यावर चढण्याआधी मित्राने दिला जोर का झटका; नवरदेव हादरला व्हिडीओत पाहू शकता नवरदेव आपली वरात घेऊन नवरीच्या दारात आला आहे. पण मेहुण्यांनी त्याला दारावरच अडवलं आहे. त्याला आत जाऊच देत नाही आहेत. व्हिडीओ ऐकला तर तुम्हाला समजेल की त्या नवऱ्याकडे एक हजार एक रुपये मागत आहेत. त्यानंतर प्रवेश देऊ आणि नवरीला भेटू देऊ, असं त्या सांगत आहेत.  पैसे दे दो, एंट्री ले लो... असं त्या गाताना दिसत आहेत.
  आता मेहुण्या शेर आहेत तर नवरदेव सव्वाशेर आहे. त्यानेही आपल्या मेहुण्यांना प्रोत्साहीत केलं. फक्त एक हजार एक नाही, एक हजार दोन, एक हजार तीन बोलत आपले शगुनचे पैसे वाढवा असं तो त्यांना सांगतो. मजल्यावरील खिडकीतून नवरीसुद्धा हे सर्व पाहत असते.  बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मेहुण्या काय दारातून हटवण्यासाठी तयार नाहीत.  शेवटी नवरा आपला मार्ग आपणच शोधतो. तो छतावर चढतो. त्याचे मित्र त्याला छतावर चढवण्यात मदत करतात. त्यानंतर नवरदेव छतावरून नवरी ज्या खिडकीत उभी आहे, तिथपर्यंत पोहोचतो आणि तिला मिठी मारतो. हे वाचा - VIDEO - इथंही सोडली नाही एकमेकांची साथ, वृद्ध दाम्पत्याने एकत्र ऐटीत सोडला धूर मेहुण्यांना शगुनचे पैसे न देताच नवरदेव आपल्या नवरीला भेटून दाखवतो. मेहुण्या पाहतच राहतात. पण नवरदेवाचं नवरीवरील इतकं प्रेम पाहून त्यासुद्धा इमोशनल झालेल्या दिसतात. पंजाबी लग्नाचा हा व्हिडीओ getweddinginspo या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. जो नेटिझन्सना आवडला आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या