मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नात नवरदेवाचा तो 'अवतार' पाहून संतापली; विधी सुरू असतानाच नवरीचा विवाहास नकार, अन् मग...

लग्नात नवरदेवाचा तो 'अवतार' पाहून संतापली; विधी सुरू असतानाच नवरीचा विवाहास नकार, अन् मग...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नवरदेव दारूच्या नशेत मंडपात पोहोचल्याने नवरीने मोठा निर्णय घेतला. तिने ऐनवेळी लग्नास नकार दिला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Assam, India

दिसपूर 12 मार्च : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मात्र अनेकदा लग्नाच्या मंडपात ऐनवेळी अशा काही घटना घडतात की क्षणात हा आनंद दुःखात बदलतो. असंच काहीसं झालं आसाममधील एका लग्नात. ज्यात आपल्यात लग्नात दारू पिऊन पोहोचलेल्या नवरदेवाला नवरीशिवायच आपली वरात घेऊन मंडपातून घरी परतावं लागलं.

नवऱ्याने शरीरावर काढला बायकोच्या 'त्या' फोटोचा टॅटू, महिला संतापली, पाहा Photo

आसामच्या नलबाडी जिल्ह्यात नवरदेव दारूच्या नशेत मंडपात पोहोचल्याने नवरीने मोठा निर्णय घेतला. तिने ऐनवेळी लग्नास नकार दिला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यात दिसतं की नवरदेवाला मंडपात बसून विधी पार पाडणंही कठीण जात आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेव जमिनीवर पडलेला दिसत आहे. पंडिताने त्याला मंत्र म्हणायला सांगितल्यावर त्याला तेही करता येत नव्हतं.

प्रसेनजीत हलोई असं वराचं नाव असून तो नलबारी शहरातील रहिवासी आहे. वधूच्या नातेवाईकाने सांगितलं की, लग्न चांगलं चाललं होतं. आम्ही सर्व विधी पूर्ण केले. आमच्या घरच्यांनी लग्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकरण वाढल्यावर मुलीने हे लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

नवरीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वराकडील सुमारे 95 टक्के पुरुष दारूच्या नशेत होते, त्यानंतर मुलीकडील लोकांनी गावातील बुर्हा (आसामी गावचा नेता) यांच्याशी संपर्क साधला आणि पोलिसांना माहिती दिली. नातेवाईकांनी सांगितलं की, वराला गाडीतून उतरताही येत नव्हतं. त्याचे वडील आणखीनच दारूच्या नशेत होते. या विचित्र घटनेनंतर वधूच्या नातेवाईकांनी नलबारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून लग्नासाठी नुकसान भरपाईची मागणी केली.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Wedding couple