नवी दिल्ली, 11 मार्च : प्रेम कधी कोणाचं कोणावर होईल याचा काही नेम नसतो. प्रेमात अनेकजण काहीही करायला तयार असतात. आपल्या जोडीदाराला आनंदी करण्यासाठी, त्यांचा मूड चांगला करण्यासाठी ते बऱ्याच गोष्टी करतात. यातील अनेक जणांच्या घटना सोशल मीडियावरही चर्चेत येतात. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे, ज्यामध्ये एका नवऱ्याने आपल्या बायकोसाठी एक खास गोष्ट केली. मात्र बायको आनंदी व्हायचं सोडून त्याच्यावर भडकते. हे नेमकं प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया. सध्या समोर आलेल्या घटनेमध्ये एका नवऱ्याने आपला बायकोसाठी खास टॅटू काढला. मात्र हा टॅटू पाहून बायको आनंदी झाली नाही उलट नवऱ्यावर ती भडकली. आपल्या पत्नीच्या चेहर्याचा टॅटू अंगावर गोंदवून घेतला, पण असा फनी एक्स्प्रेशनचा बनवला, जो पाहून सोशल मीडियावर लोकांना हसू आवरता आले नाही आणि पत्नीला राग अनावर झाला.
व्हायरल
जेरी आणि त्याची पत्नी टेगन यांचे टिकटॉकवर हजारो फॉलोअर्स आहेत आणि ते अप्रतिम व्हिडिओ बनवतात. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये जेरीने त्याच्या शरीरावर बनवलेला टॅटू दाखवले आहेत. त्याने त्याच्या बायकोचा मजेशीर फोटो टॅटू केला. त्याने टिकटॉक व्हिडिओमध्ये सांगितले की त्याच्या शरीरावर बनवलेला हा टॅटू त्याच्या पत्नीचा आहे जेव्हा ती तिच्या मित्रांसोबत हसत होती आणि विनोद करत होती. तिचे एक्सप्रेशन खूपच मजेदार दिसत आहेत. डोळे मिटले आणि दात घट्ट केलेले.
पती लोकांच्या संदेशांना उत्तर देत आहे ज्यांनी त्याला विचारले की त्याच्या शरीरावरील सर्वात मजेदार टॅटू कोणता आहे. त्याने व्हिडिओमध्ये सांगितले की त्याला हा टॅटू खूप आवडतो पण त्याच्या पत्नीला तो खूप वाईट वाटतो आणि जेव्हा तिने तो पाहिला तेव्हा ती चिडली. लोकांच्या मात्र मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.