नवी दिल्ली 02 ऑक्टोबर : आजकाल सोशल मीडियावर (Social Media) नवरी आणि नवरदेवाचे व्हिडिओ (Bride and Groom Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. यात नवरी-नवरदेवाचा डान्स (Bride-Groom Dance), रुसवे, फुगवे, खेळ, निरनिराळ्या प्रथा असे अनेक व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लग्नानंतरच्या पाठवणीचा आहे. यात दिसतं, की नवरी नवरदेवासोबत जाण्यास नकार देते आणि असं काही करते जे पाहून उपस्थित सगळेच लोक हैराण झाले. या व्हिडिओला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
OMG! विषारी नागाच्या पोटातून बाहेर पडली सशाची 16पिल्ले; अंगावर काटा आणणारा VIDEO
हा व्हिडिओ इतका मजेशीर (Funny Video) आहे की पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. यात नवरीबाई लग्नानंतर पाठवणीवेळी असं काही करते की सगळेच पाहात राहतात. पाठवणीसाठी रडतच खोलीतून बाहेर निघालेली नवरी अचानक लाकडी पायऱ्या लावून छतावर चढते.
View this post on Instagram
इतकंच नाही तर आपल्याला कोणी छतावरुन उतरवू नये यासाठी ती पायानं ही सीडीदेखील खाली टाकून देते. इकडे सगळे कुटुंबीया दिला खाली उतरण्यास सांगताना दिसतात.
चक्क जेसीबीवरुन निघाली लग्नाची वरात; नवरी-नवरदेवाचा हा Video ठरतोय चर्चेचा विषय
नवरीच्या या ड्राम्यानंतर नवरदेवाचा (Groom) सीन सुरू होतो. तो नवरीला छतावरुन खाली येण्याची विनंती करतो. मात्र, तरीही नवरीनं न ऐकल्यानं तो तिथे उपस्थित लोकांना मदत मागू लागतो. तरीही नवरी न उतरल्यानं नवरदेवही चिंतेत पडतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, ते समोर आलेलं नाही. मात्र, हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत 8 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर, अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.