हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 02 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील करवन गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याच्या पाळीव सशाला नागाने दंश केला आहे. तसेच सशाची तब्बल सोळा पिल्लं गिळली आहेत. रात्रीच्या सुमारास आलेल्या नागाने सशाच्या 16 पिल्लांवर ताव मारला आहे. पण एवढ्या साऱ्या पिल्लांवर ताव मारल्याने नागाला जागेवरून हलताही येत नव्हतं. दरम्यान शेतकऱ्याने या घटनेची माहिती सर्पमित्राला दिल्यानंतर, सर्पमित्राने घटनास्थळी धाव घेतं नागाला पकडलं आहे. सर्पमित्राने नागाला पकडल्यानंतर नागाच्या पोटातून सशाची 16 पिल्लं बाहेर पडली आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. नागाने सशाला दंश करून सोळा पिल्लांवर ताव मारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नागाने सशाला भक्ष्य करीत त्याची पिल्लं खाल्याची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली होती. यानंतर अनेक गावकऱ्यांनी नागाला पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती.
खरंतर, चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील करवन येथील शेतकरी दिवाकर चौधरी यांनी आपल्या घरी काही ससे पाळले होते. यातीलच एका सशाने अलीकडेच काही पिल्लांना जन्म दिला होता. पण काल रात्री भक्ष्याच्या शोधात आलेल्या एका नागाने 16 पिल्लांवर ताव मारला आहे. नागाने सशाला दंश करून त्याची सर्व पिल्लं गिळली होती. पण एकाच वेळी सोळा पिल्लं गिळल्यानं नागाची हालचाल मंदावली होती. हेही वाचा- बंदिस्त होण्याआधी कोब्राने घेतला बदला, सर्पमित्रालाच दिला मृत्यू; थरारक VIDEO दरम्यान, शेतकरी चौधरी यांनी गावातील काही सर्पमित्रांना याची माहिती दिली. सर्पमित्रांनी नागाला पकडल्यानंतर नागाने आपल्या पोटातून सुमारे 16 पिल्लं बाहेर पडली आहेत. गावातील काही स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे.