जाहिरात
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान कोण? नवरदेवाला उत्तर देता आलं नाही, मग नवरीने दिराचाच हात पकडून घेतले सात फेरे

पंतप्रधान कोण? नवरदेवाला उत्तर देता आलं नाही, मग नवरीने दिराचाच हात पकडून घेतले सात फेरे

नवरीने लग्न मोडून दिरासोबतच बांधली लग्नगाठ

नवरीने लग्न मोडून दिरासोबतच बांधली लग्नगाठ

6 महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न ठरलं होतं. तेव्हापासून मुलगी आणि मुलगा फोनवर एकमेकांशी बोलत होते. दोघांच्या लग्नाची तारीख 11 जून निश्चित झाली होती. पण..

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लखनऊ 21 जून : लग्नांमध्ये अनेक विचित्र घटना घडल्याचं ऐकायला मिळतं. मात्र, सध्या उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून जे प्रकार समोर आलं आहे, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. खरं तर, गाझीपूर जिल्ह्यातील सैदपूर भागात एका लग्न समारंभात एका वराला भारताच्या पंतप्रधानांचे नाव विचारण्यात आले. पण या प्रश्नाचे उत्तर त्याला अजिबात देता आले नाही. मग काय, मुलीकडच्यांनी त्याला मानसिक रुग्ण म्हणत आपल्या मुलीचं लग्न वराच्या लहान भावाशी लावून दिलं. या घटनेची माहिती आता संपूर्ण परिसरात पसरली आहे. ही घटना 11 जून रोजी सैदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नसीरपूर गावात घडली. वराचं नाव शिव शंकर होतं, ज्याचा विवाह रंजना नावाच्या मुलीशी निश्चित झाला होता. 6 महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न ठरलं होतं. तेव्हापासून मुलगी आणि मुलगा फोनवर एकमेकांशी बोलत होते. दोघांच्या लग्नाची तारीख 11 जून निश्चित झाली होती. शिवशंकर लग्नाची वरात घेऊन वाजतगाजत रंजनाच्या घरी पोहोचला. दोघांचं लग्न रितीरिवाजानुसार पार पडलं.

News18लोकमत
News18लोकमत

मात्र, दुसर्‍या दिवशी सकाळी लग्नाचा काहीतरी विधी सुरू असताना मेहुण्यांनी त्यांचा दाजी म्हणजेच शिवशंकर यांच्याशी मस्करी करायला सुरुवात केली. गमतीने त्यांनी वराला विचारलं, ‘देशाचा पंतप्रधान कोण आहे?’ गोंधळलेल्या वराला या साध्या प्रश्नाचं उत्तर देता आले नाही. मग काय… त्याला आणखीही प्रश्न विचारण्यात आले आणि शेवटी मुलीकडच्यांनी मुलगा मानसिक रुग्ण असल्याचं म्हटलं. वराच्या वडिलांनी सांगितलं की मुलीकडच्यांनी त्यांच्या मुलाला गतिमंद म्हटलं आणि बंदुकीच्या जोरावर त्यांची मुलगी रंजनाचं शिवच्या धाकट्या भावाशी लग्न लावून दिलं. धाकटा भाऊ अजून लग्नाच्या वयाचाही नव्हता. मुलाकडच्यांनी तरीही हे लग्न योग्य म्हणून मान्य केलं आणि सुनेला पूर्ण सन्मानाने घरी नेलं. पण एक दिवस अचानक मुलीकडचे पुन्हा घरी आले आणि मुलीला घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांना बोलावलं. आता पोलीस हे प्रकरण हाताळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride , marriage
  • First Published :
जाहिरात
जाहिरात