मुंबई, 13 डिसेंबर : लग्न हा प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील सर्वात खास असा क्षण असतो. लग्नाच्या (Wedding video) दिवशी नवरा-नवरीच्या (Bride groom video) चेहऱ्यावरील आनंद काही वेगळाच असतो (Bride laughing video). लग्नात आपल्या जोडीदाराला समोर पाहून नवरा-नवरी भावुक झाल्याचंही तुम्ही पाहिलं असेल (Wedding funny video). नवरा-नवरी रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता एका अशा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमचं पोट दुखेल पण हसू थांबवणार नाही. लग्नात नवरीबाई थोडी लाजते, गालातल्या गालात हसते आणि रडतानाही दिसते. पण इथं मात्र नवरीबाई इतकी हसली इतकी हसली की तिचं हसू पाहून नवरदेवालाही घाम फुटला. ती अशा पद्धतीने हसली की नवरा तिचं रूप पाहून घाबरला. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांचा हात हातात धरून एकमेकांसमोर उभे आहेत. त्यांच्यामध्ये एक पादरी आहे. अचानक नवरी हसू लागते. ती मोठमोठ्याने हसते. नवरीला हसू बिलकुल आवरत नाही. तिचं रूप पाहून सर्वजण हैराण होतं. हे वाचा - अरे याला आवरा! भरमंडपात उतावळा नवरा; लग्नविधी सुरू असतानाच काय केलं पाहा VIDEO इतक्या विचित्र पद्धतीने हसताना दिसते की तिला पाहून नवरदेवही घाबरतो. आता मी आयुष्यभर या आवाजाला घाबरेन असं तो म्हणतो. ते ऐकून तर नवरी आणखी मोठमोठ्याने हसू लागते. हसून हसून तिचं पोट दुखू लागतं, ती जमिनीवर बसण्याचा प्रयत्नही करताना दिसते. त्यानंतर मग नवरदेवाच्या खांद्यावर डोकं ठेवून हसते. त्यानंतर लग्नात उपस्थितीत असलेल्या सर्वांनाच हसू कोसळतं.
कहते हैं "#शादी" ज़िंदगी का सबसे ख़ुशीयों भरा पल होता है!
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 13, 2021
पर इतना ???😂😂 pic.twitter.com/GxrFi9ac4T
आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लग्न हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो असं म्हटलं जातं. पण इतका? असं मजेशीर कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा - ‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’; नवरीनं नवरदेवाच्या भांगात भरलं कुंकू, लग्नाचा VIDEO या नवरीबाईला लग्नाचा इतका आनंद झाला आहे की ती आऊट ऑफ कंट्रोल झाली आहे. तिला हसताना पाहून आपल्यालाही पोट दुखेपर्यंत हसू येतं. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. बहुतेकांनी तर नवरीला असं हसताना पाहून नवरदेवाबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांनी असे आनंदाचे अश्रू तरुणाच्या डोळ्यात येतल. लग्नाआधी सर्वच हसतात, नवरदेवाला त्याचं भविष्य काय आहे हे समजलं आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.