मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नादिवशीच नवरा-नवरीचा प्रताप! कॅमेऱ्यात कैद झालं त्यांचं 'ते' कृत्य; VIDEO VIRAL

लग्नादिवशीच नवरा-नवरीचा प्रताप! कॅमेऱ्यात कैद झालं त्यांचं 'ते' कृत्य; VIDEO VIRAL

नवरा-नवरी लग्नातच असं काही करू शकतात याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल.

नवरा-नवरी लग्नातच असं काही करू शकतात याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल.

नवरा-नवरी लग्नातच असं काही करू शकतात याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 03 सप्टेंबर : लग्नात (Wedding Video) नवरा-नवरी (Bride Groom Video) रोमँटिक, इमोशनल होतात. एकमेकांना पाहिल्यानंतर होणार आनंद, त्यामुळे डोळ्यातून येणारे अश्रू, वरमाला घालताना मजामस्ती असे लग्नाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या लग्नाचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात नवरा-नवरीने जे केलं ते पाहून तुम्ही थक्कच व्हाल.

नवरा-नवरी आपल्या लग्नात असं काही करू शकतात याचा विचारही तुम्ही केला नसेल. लग्न होताच नवरा-नवरीने लग्नाच्या दिवशीच मंडपात प्रताप केला. त्यांनी लपूनछपून काहीतरी केलं पण ते कॅमेऱ्यापासून लपलं नाही. त्यांचं ते कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल (Viral Video) झाला आहे (Funny Video).

लग्न म्हटलं की जेवण आलंच. लग्नाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचं जेवण झालं की नवरा-नवरी आपल्या नातेवाईकांसोबत जेवायला बसतात. असेच जेवायला बसलेल्या नवरा-नवरीचा हा व्हिडीओ.

हे वाचा - चाललंय तरी काय? भरमंडपातच मेहुणीने नवरदेवाला केला असा इशारा; VIDEO VIRAL

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांच्या बाजूला बसून जेवत आहे. नवरा जेवता जेवता कॅमेऱ्याकडे पाहतो आहे. तितक्यात नवरी आपल्यासमोरील ताटातील हात काढून नवरदेवाच्या ताटात टाकते आणि त्याच्या ताटातील पापड त्याच्या नकळत हळूच चोरते. त्यानंतर काहीच झालं नाही असं दाखवत ती तिच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या नातेवाईकाशी बोलायला लागते.

नवरदेवाची नजर कॅमेऱ्यावरून आपल्या ताटाकडे जाते. आपल्या ताटातील पापड गायब असल्याचं त्याला समजतं. नवरीच्या ताटात तो पापड असल्याचंही त्याच्या लक्षात येतं. नवरी तेव्हा तिच्या शेजारी बसलेल्या नातेवाईकासोबत बोलण्यात दंग असते. तेव्हा नवरदेव नवरीच्या ताटातील आपला पापड पुन्हा उचलतो आणि आपल्या ताटात ठेवतो.

हे वाचा - रस्त्यावरच आऊट ऑफ कंट्रोल झाले नवरी-नवरदेव; विचित्र डान्सचा VIDEO व्हायरल

त्यानंतर नवरीचं लक्ष नवरदेवाकडे जातं. दोघंही एकमेकांकडे पाहू हसता. लग्नात नवरा-नवरीची ही चोरी पाहून तुम्ही याला क्युट म्हणाल. इन्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्याच आलेला हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding video