मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - थरथर कापू लागला, घाम फुटला, रडूही कोसळलं! नवरा-नवरीच्या मध्ये येताच बिथरला तरुण

VIDEO - थरथर कापू लागला, घाम फुटला, रडूही कोसळलं! नवरा-नवरीच्या मध्ये येताच बिथरला तरुण

नवरा-नवरीसोबत फोटो काढणाऱ्या या तरुणाला पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

नवरा-नवरीसोबत फोटो काढणाऱ्या या तरुणाला पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

नवरा-नवरीसोबत फोटो काढणाऱ्या या तरुणाला पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

मुंबई, 28 जुलै : लग्नात (Wedding Video) नवरा-नवरीसोबत (Bride Groom Video) फोटो काढण्याची संधी तशी शक्यतो कुणीच सोडत नाही. त्यातही नवरा-नवरीला वेगळं करून त्यांच्यामध्येच उभं राहून फोटो काढण्यात तर अनेकांना मजाच येते. नवरा-नवरीच्या मध्येच उभं राहून फोटो (Boy between bride and groom) काढणाऱ्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. पण त्याला पाहून त्याने हा फोटो मजेत नाही तर अशा अवस्थेत काढला आहे, की पाहून तुम्हाला मात्र नक्की हसू येईल.

एका लग्नातील नवरा-नवरीच्या फोटोसेशनचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओत नवरदेव आणि वधूपेक्षा त्यांच्यामध्ये आलेल्या तिसऱ्याच तरुणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण काय ते तुम्ही व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला समजेलच.

व्हिडीओत पाहू शकता सुटाबुटात हा तरुण स्टेजवर नवरा-नवरीसोबत फोटो काढायला आला. त्या दोघांच्या मध्ये तो उभा राहिला. पण त्याने नवरीकडे किंचितशी पाठ केलेली दिसते आहे. तो नवऱ्याच्या दिशेनेच पाहतो आहे. तो आनंदात, उत्साहात नाही तर निराश आणि घाबरलेला असा दिसतो आहे.

हे वाचा - नवरी जोमात नवरदेव कोमात! लाजणं दूर नववधूने मंडपातच ऐटीत तोंडातून सोडला धूर

फोटो काढताना तो थरथर कापताना दिसतो आहे, त्याला घामही फुटला आहे. तरुणीला पाहून नवरा-नवरीलाही हसू येतं. कसंबसं करून तरुण एकदाचा फोटो काढतो आणि स्टेजवरून खाली उतरायला जातो. अरे हे काय? तरुणाने आपला एक हात आपल्या डोळ्यांजवळ नेला. त्याला रडूच कोसळलं. आपल्या हातांनी आपले अश्रू पुसताना तो दिसतो.

निरंजन महापात्रा इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता तरुणाची अशी अवस्था का झाली. तो का रडतोय, तो इतका निराश किंवा घाबरलेला का आहे? त्याच्या अशा अवस्थेमागे नेमकं काय कारण आहे? हे माहिती नाही. पण व्हिडीओ पाहून त्यावर मजेशीर कमेंटही येत आहेत. नेटिझन्स तरुणाची अशी अवस्था का झाली असावी याचा अंदाज लावत आहेत.

हे वाचा - नवरी जोमात नवरदेव कोमात! लाजणं दूर नववधूने मंडपातच ऐटीत तोंडातून सोडला धूर

तुम्हाला काय वाटतं हा तरुण असा का बिथरला असावा? हे आम्हाला आमच्या सोशल मीडियावर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video