जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - फक्त एका कापडासाठी भिडले दोन पक्ष; लग्नात घातला भलताच गोंधळ

VIDEO - फक्त एका कापडासाठी भिडले दोन पक्ष; लग्नात घातला भलताच गोंधळ

लग्नात दोन पक्षांचा धिंगाणा.

लग्नात दोन पक्षांचा धिंगाणा.

लग्नाचा हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला काळजाचा ठोका चुकतो पण नंतर हसूही आवरत नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑगस्ट : लग्नामध्ये (Wedding Video) मजामस्ती, रुसवे-फुगवे, मानपानही आलेच. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल (Viral Video)  होतो आहे. ज्यात वधू आणि वर (Bride Groom Video) दोन्हीकडील पक्ष फक्त एका कापडासाठी आपसात भिडले. त्यांनी लग्नाच भलताच गोंधळ घातला (Funny video). सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत होता होता टळली आहे. लग्नाचा एक धक्कादायक पण मजेशीर असा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये नवरदेव आणि नवरीकडील मंडळी नवरा-नवरीच्या डोक्यावर धरलेलं कापड आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी समोरासमोर बसले आहेत. त्यांचे मागे त्यांचे नातेवाईक उभे आहेत. दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी नवरा-नवरीच्या डोक्यावर एक कापड धरलेलं आहे. हे कापड मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष आपसात भिडले आहेत. आपल्यालाच कापड मिळावं, यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहेत, पूर्ण ताकद लावली जात आहे. हे वाचा -  नवरदेवाची पाठ फिरताच नवरीला…; लग्नात Ex-boyfriend ने काय केलं पाहा VIDEO अखेर वरपक्ष आपल्याकडे कापड खेचण्यात यशस्वी होतं आणि त्याचवेळी नवरीकडील मंडळी धाडकन कोसळतात. एक महिला आणि पुरुष तर नवरा-नवरीच्या समोरच जाऊन पडते. महिला तर अक्षरशः उडतेच. व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचाही ठोका चुकतो. सुदैवाने मोठी दुर्घटना होत नाही. सर्वजण हसू लागतात आणि मग काय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याही हसू आवरत नाही. हे वाचा -  …अन् शेवटी रडत नवरदेवाने भरमंडपात नवरीच्या पायावरच डोकं टेकलं; VIDEO VIRAL प्रत्येक लग्नात वेगवेगळ्या विधी-परंपरा असतात. ज्या अगदी खेळाप्रमाणे केल्या जातात. अशीच ही एखादी परंपरा आहे. पण मजेमजेत असे खेळ खेळताना हानीही होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.  निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात