मुंबई, 13 डिसेंबर : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही मजेशीर, काही भावुक असतात. कधी लग्नात हटके एंट्री, कधी होणाऱ्या जोडीदारासाठी सरप्राइझ डान्स, तर कधी तिला किंवा त्याला पाहताच डोळ्यात येणारं पाणी... असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण लग्नातील हा धक्कादायक असा व्हिडीओ आहे.
लग्नामध्ये मजामस्तीसह, मानपानावरून रूसवेफुगवेही होतातच. पण अशा वातावरणातही नवरा-नवरी एका वेगळ्याच दुनियेत असतात. नातेवाईकांच्या सायलंट भांडणात नवरा-नवरीचे दो दिल मात्र चुपके चुपके भेटत असतात. आँखो ही आँखो में त्यांचे इशारे सुरू असतात. इथं मात्र वेगळंच चित्र दिसून येतं आहे.
एरवी रोमँटिक अंदाजात किंवा इमोशनल झालेले दिसणारे नवरा-नवरी इथं मात्र आक्रमक झालेले दिसत आहेत. भरमंडपात त्यांनी एकमेकांना धुतलं आहे. स्टेजवरच त्यांनी एकमेकांना मारहाण करायला सुरुवात केली आणि काही क्षणात लग्नमंडप कुस्तीचा आखाडा बनलं. तसं नवरा-बायको म्हटलं की भांडणं होतातच पण यांची भांडणं काय... हे कपल तर लग्नातच मारहाणीपर्यंत पोहोचलं. असं लग्नात घडलं तरी काय की त्यांनी असं पाऊल उचललं.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता स्टेजवर नवरा-नवरी एकमेकांसमोर उभे आहेत. नवरदेव नवरीबाईला मिठाई भरवतो आहे. नवरी ते खात नाही आहे. म्हणून नवरदेव जबरदस्ती तिच्या तोंडात कोंबतो आहे. नवरीबाई सुरुवातील कंट्रोल करतो पण नंतर मात्र तिच्या रागाचा पारा सुटतो आणि ती नवरदेवाच्या कानशिलात लगावते. नवरदेवाचाही इगो हर्ट होतो आणि तो नवरीला एकाऐवजी दोन कानाखाली लगावतो. मग काय दोघंही एकमेकांना मारत सुटतात. एकमेकांचे केसही उपटता.
त्यांच्या आजूबाजूला असलेले नातेवाईक, मित्रमैत्रिणी त्यांना रोखण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण दोघांपैकी एकही मागे हटायला तयार नाही. व्हिडीओच्या शेवटी पाहाल तर नवरीबाई नवरदेवाला उचलते आणि धाडनक स्टेजवर आपटते.
हे वाचा - मुलीच्या लग्नात नाचता-नाचता अचानक कोसळले; पित्याचा हृदयद्रावक शेवट, नवरीनं घेतला हा निर्णय
@gharkekalesh ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने हे लग्न होत आहे की घटस्फोट? असं विचारलं आहे. तर एकाने हे तर सुरू होण्याआधीच संपलं, असं म्हटलं आहे. एकाने तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला लग्नच करायचं नाही असं म्हटलं आहे. काहींनी हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे.
Kalesh B/w Husband and Wife in marriage ceremony pic.twitter.com/bjypxtJzjt
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 13, 2022
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video