जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: एकमेकांना नाही तर स्टेजवर तिसऱ्यालाच KISS करताना दिसले नवरी-नवरदेव

Viral Video: एकमेकांना नाही तर स्टेजवर तिसऱ्यालाच KISS करताना दिसले नवरी-नवरदेव

नवरी आणि नवरदेवाचा श्वानासोबत डान्स (प्रतिकात्मक फोटो)

नवरी आणि नवरदेवाचा श्वानासोबत डान्स (प्रतिकात्मक फोटो)

लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ थोडा हटके आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 13 जून : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दररोज लोक काहीतरी वेगळं किंवा आश्चर्यचकित करणारं इथे पोस्ट करत असतात. अनेक वेळा आपल्याला लग्नाचे काही मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. या व्हिडिओंमध्ये वधू-वराव्यतिरिक्त, लग्नाच्या वराती आणि नातेवाईकांच्या वेगवेगळ्या गमतीही नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. भरपूर मनोरंजनामुळे लोकांना लग्नाशी संबंधित व्हिडिओ पाहायला आवडतात. आता पुन्हा लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ थोडा हटके आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वधू आणि वर त्यांच्या कुत्र्यासोबत स्टेजवर डान्स करत आहेत. कदाचित हा खास व्हिडिओ पाहून तुमचाही दिवस चांगला जाईल. IAS बनायचं असल्याचं सांगूनही घरच्यांनी जबरदस्तीने जमवलं लग्न, ऐनवेळी नवरीने उचललं मोठं पाऊल सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक जोडपं त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत नाचताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही लग्नाच्या पोशाखातलं जोडपं त्यांच्या कुत्र्यासोबत नाचताना पाहू शकता. डान्स करताना ते त्यांच्या कुत्र्याला मिठी मारताना दिसत आहेत. इतकंच नाहीतर नवरी आणि नवरदेव त्याला किसही करताना दिसतात

जाहिरात

हा मनमोहक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर goldenretriever_lilly नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला ही बातमी लिहेपर्यंत 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्सना हा डान्स व्हिडिओ खूप आवडला आहे, यूजर्सना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की त्यांनी त्याचं पूर्ण व्हर्जन अपलोड करण्यास सांगितलं आहे. अनेकजण कमेंट करून यावर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात