लखनऊ 13 जून : एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. एक वधू तिच्या लग्नाच्या एक दिवस आधी घरातून पळून गेली कारण तिला तिचा अभ्यास सुरू ठेवायचा होता आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करायची होती. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये घडली. तरुणीचा विवाह 3 जून रोजी मिर्झापूर येथील तरुणासोबत निश्चित झाला होता. मात्र, लग्नाच्या एक दिवस आधी लग्नाचे काही विधी पार पडत असताना वधूने घरातून पळ काढला. वृत्तानुसार, जेव्हा वधू च्या कुटुंबीयांना ती बेपत्ता असल्याचं कळालं तेव्हा त्यांना धक्का बसला आणि ते घाबरले. त्यांनी तिला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही. रात्री उशिरापर्यंत मुलगी न सापडल्याने तिच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, वधूच्या कुटुंबाने आपली इज्जत वाचवण्यासाठी कुटुंबातील दुसऱ्या मुलीचं नवरदेवासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. वधूच्या कुटुंबाने वराला आणि त्याच्या कुटुंबाला परिस्थितीची माहिती दिली आणि कुटुंबातील दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. दारावर उभी होती वरात, EX बॉयफ्रेंडने नवरीच्या होणाऱ्या पतीला पाठवले नको ते PHOTOS, मग काय… नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय यासाठी तयार झाले आणि थाटामाटात हे लग्न पार पडलं. दुसरीकडे, गावात लपून बसलेली वधूही पोलिसांनी शोधून काढली आणि तिला ताब्यात घेतलं. स्टेशन प्रभारी रामसुरीख गौतम यांनी सांगितलं की, फरार झालेली वधू गावातीलच एका प्राथमिक शाळेत सापडली. वधूला पळून जाण्याचं कारण विचारलं असता तिने सांगितलं की, मला यूपीएससीची तयारी करायची आहे, पण घरातील सदस्य जबरदस्तीने लग्न करू इच्छित होते. ती पुढे म्हणाली की, तिला आईएएसची तयारी करायची असल्याचं तिने आधीच सांगितलं होतं. त्यानंतरही ते तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते आणि उज्ज्वल भविष्यासाठी हे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करत होते. ती म्हणाली की ती स्वतः घरातून पळून गेली होती आणि कोणीही तिला हे पाऊल उचलण्यास भाग पाडलं नाही किंवा सल्ला दिला नाही. दरम्यान, वधूच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलीस अनेक बाजूंनी तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.