• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • मेहुणीने बूट चोरताच नवरदेव आऊट ऑफ कंट्रोल; VIDEO मध्येच पाहा त्याने काय केलं

मेहुणीने बूट चोरताच नवरदेव आऊट ऑफ कंट्रोल; VIDEO मध्येच पाहा त्याने काय केलं

मेहुणीने बूट चोरी करताच नवरदेवाने चांगलाच ड्रामा केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 04 ऑगस्ट : लग्नात (Wedding Video) बऱ्याच विधी परंपरा असतात. त्यापैकी काही खूपच मजेशीर असतात. त्यापैकीच एक म्हणजे नवऱ्याची बूट चोरी (Juta Churai). नवरीच्या बहिणी आणि  मैत्रिणी नवऱ्याचे बूट लपवतात. आपल्या दाजींकडून त्याबदल्यात पैसे घेतल्यानंतरच मेहुण्या त्यांना बूट देतात. बिचाऱ्या नवऱ्याला गप्पपणे मेहुण्यांचा हट्ट पुरवावा लागतोच. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक असा व्हिडीओ व्हायरल  (Viral Video) होतो आहे, ज्यात मेहुणीने बूट चोरी करताच नवरदेवाने चांगलाच ड्रामा (Bride groom drama) केला आहे. बूट चोरीनंतर ड्रामा करणारा हा नवरदेव सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. बूट चोरीचा हा मजेशीर व्हिडीओ (Funny Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
    rajnesh_meena_083 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी एका ठिकाणी बसले आहेत. नवऱ्याचे मित्रही त्याच्यासोबत आहेत. नवऱ्याने आपले बूट शेजारीच काढून ठेवले आहेत. इतक्यात हळूच दरवाजातून त्याची मेहुणी येते आणि त्याचे बूट चोरून नेते. नवऱ्याला बूट चोरीनंतर धक्काच बसतो. तो सॉलिड ड्रामा करतो. हे वाचा - अरे बापरे! नवरीला किस करताच बेशुद्ध झाला नवरा, धाडकन स्टेजवर कोसळला; पाहा VIDEO नवरदेव जमिनीवर अक्षरश: लोळण घेतो. लहान मुलांचा एखादा हट्ट पूर्ण केला नाही की ते कसे जमिनीवर आपले हातपाय आपटून लोळत रडतात. तसाच हा नवरदेवही ओरडतो, रडतो. त्यावेळी त्याच्या डोक्यावरील फेटाही पडतो. त्याला असं करताना पाहून त्याचा मित्रही घाबरतो. तो लगेच दरवाजातून बाहेर जातो आणि बूट घेऊनच परत येतो. तो नवरदेवाच्या हातात बूट देतो आणि त्याचा पडलेला फेटा त्याच्या डोक्यावर घालतो. बूट मिळताच नवरा आपला ड्रामा थांबवतो आणि बूट हातात घेऊन, छातीशी कवटाळून धरून शांत बसतो. हे वाचा - नवरदेव जवळ येताच मंडपातच ढसाढसा रडू लागली नवरी; असं झालं तरी काय पाहा VIDEO नवऱ्याने सॉलिड ड्रामा करून आपले बूट परत मिळवले आहेत. यासाठी त्याला मेहुणीला पैसेही द्यावे लागले नाहीत. पैसे ने देताच आपले बूट परत मिळवण्याची नवऱ्याची ही शक्कल नेटिझन्सना चांगलीच आवडली आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published: