मुंबई, 03 ऑगस्ट : लग्न (Wedding video) म्हणजे एका नव्या आयुष्याची सुरुवातच असते. त्यामुळे नवरा-नवरी (Bride and groom video) दोघांच्याही मनात थोडी चिंता, भीती असतेच. शिवाय माहेर सोडून सासरी नव्या घरी जाणाऱ्या नववधूच्या (Bride video) मनात जास्तच धाकधूक असते. माहेरच्या माणसांना सोडून जाताना पाठवणीवेळी तिचा उर भरून येतो आणि आपल्या माहेरच्या मंडळींना मिठी मारून मारून ती रडते (Bride crying). पण सध्या सोशल मीडियावर (Social media) अशा नवरीचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, जिला लग्नातच रडू कोसळलं आहे. नवरा जवळ येताच ती ढसाढसा रडू लागली आहे.
लग्नात अनेक विधी असतात. या विधींचे क्षण जपून ठेवावे असेच असतात. हे विधी करताना काही वेळा नवरा-नवरी भावुकही होतात. अशाच विधीवेळी भावुक झालेली ही नवरी.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता नवरी स्टेजवर हात जोडून बसली आहे. तिच्या आजूबाजूला नवरा-नवरी दोघांचेही. तिच्यासमोर नवरदेव उभा आहे आणि तो तिला मंगळसूत्र घालतो आहे. जसं नवरा मंगळसूत्र घालतो तसे नवरीचे डोळे भरून येतात. तिच्या डोळ्यांचा बांध फुटतो आणि ती ढसाढसा रडू लागते.
हे वाचा - लय भारी! नटूनथटून लेहंग्यावरच नवरीने आधी मारल्या पुशअप्स; पाहा VIDEO
नवरीच्या शेजारी असलेली एक महिला तिचे अश्रू पुसताना दिसते. पण नवरासुद्धा मंगळूसूत्र घातल्यानंतर तिचे डोळे पुसतो आणि तिच्या डोक्यावर गोड चुंबन घेतो. मंगळसूत्र घालून झाल्यानंतर नवरी हळूच हसतानाही दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानसुद्धा दिसतं. तिचं खूप मोठं स्वप्नं पूर्ण झाल्याचा हा तिच्या चेहऱ्यावरील भाव.
हे वाचा - नवरीच्या घरी एन्ट्री करताच गगनात मावेना नवरदेवाचा आनंद; हा Video जिंकेल तुमचं मन
नवरा-नवरीच्या या गोड क्षण प्रत्येकाला भावला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण भावुक झाला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video