जयपूर 26 मे : नववधूने लग्नाच्या दिवशी पळून जाऊन लग्नाची वाट पाहत असलेल्या नवरदेवाला मोठा धक्का दिला. मात्र, 13 दिवसांनंतर घरी येऊन तिने आपल्या नवरदेवासोबतच विवाह केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वधू 13 दिवसांनंतर परतली, त्यानंतर तिचं लग्न वराशी झालं. नवरी पळून गेल्यानंतरही नवरेदव आपल्या घरी परतला नव्हता आणि गावात तिची वाट पाहत होता. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील बाली येथे ही घटना घडली.
सिरोही जिल्ह्यातील कैलाश नगरजवळील मंदार गावातील रहिवासी असलेल्या तरुणाचं लग्न 3 मे (बुधवार) रोजी पाली जिल्ह्यातील सायना गावातील मुलीसोबत निश्चित होणार होतं. मात्र, लग्नाच्या दिवशी वधू दूरच्या नातेवाईकासोबत पळून गेली. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. वधूच्या कुटुंबाने वराची आणि त्याच्या कुटुंबियांची माफीही मागितली पण ते ठाम राहिले आणि वधूशिवाय घरी जाण्यास नकार दिला.
PHOTOS: महिलेचं मैत्रिणीवर प्रेम जडलं; पतीसोबत घटस्फोट होताच दोघींनी बांधली लग्नगाठ
नवरदेव म्हणाला की वधूशिवाय तो त्याच्या गावी परत जाऊ शकत नाही कारण यामुळे त्याची प्रतिमा खराब होईल आणि तो वधूच्या घरीच थांबला. वृत्तानुसार, नवरदेव आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह 13 दिवस वधूच्या घरीच थांबला होता. नवरी बेपत्ता असल्याच्या तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी वधू ज्या अल्पवयीन मुलासोबत पळून गेली होती त्याला पकडलं आणि वधूला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं.
परतल्यानंतर वधूच्या कुटुंबीयांनी विवाह सोहळा पार पाडला आणि अखेर लग्नानंतर वर आपल्या गावी परतला. दोन्ही बाजूच्या गावातील लोकांना या घटनेची माहिती मिळताच सर्वांनी आश्चर्य व्यक्त करत नवरदेवाचं कौतुक केलं.नवरदेवदेखील आपल्या वधूला घरी घेऊन जाण्यावर ठाम राहिला आणि त्यानंतर लग्नासाठी 13 दिवस वाट पाहिली. शेवटी, वधू 13 दिवसांनी तिच्या घरी परत आली आणि नंतर त्याच वरासह तिच्या सासरच्या घरी गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.