प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, प्रेम फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातच असतं का? दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष प्रेमाने एकत्र राहू शकत नाहीत का? असं सांगितलं जात आहे की मौमिताच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं, त्यांनी तिला घरात येण्यास मनाई केली होती. पण तिने आयुष्यभर मौसमीला सोडणार नसल्याचं वचन दिलं होतं. त्यामुळे वचन पाळण्यासाठी ती आपल्या प्रेयसीसोबत भाड्याच्या घरात राहू लागली
असं सांगितलं जात आहे की, त्यांच्या प्रेमप्रकरणादरम्यान मौमिता मजुमदार काही दिवसांसाठी बाणगावहून कोलकाता येथे गेली होती. तेव्हा मौसमीला समजलं की ती तिच्याशिवाय राहू शकणार नाही. तिने सांगितलं की "जसं झाड पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसं मी तिच्याशिवाय जगू शकत नाही." म्हणून मी लगेचच लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि लग्न केलं. सध्या हे जोडपं भाड्याच्या घरात राहत आहे.