भोपाळ 18 जानेवारी : सध्या देशभरात लग्नाचा सीझनच (Wedding Season) सुरू आहे. अशात आपल्या लग्नात आपण काहीतरी हटके किंवा वेगळं करावं आणि सर्वांचं लक्ष वेधावं, असं प्रत्येक नवरीला आणि नवरदेवाला वाटत असतं. सध्या मध्य प्रदेशच्या निमच शहरातील असंच एक अनोखं लग्न (Unique Wedding) चांगलंच चर्चेत आहे. यात नवरीबाईने स्टेजवर अतिशय अनोख्या पद्धतीने एन्ट्री केली. नवरीबाई अॅक्टिव्हा गाडीवर नवरदेवाला मागच्या सीटवर बसवून स्टेजवर पोहोचली (Bride Entry in Wedding Hall). लग्नसमारंभात उपस्थित पाहुण्यांनी आणि नातेवाईकांनी फुलांनी त्यांचं स्वागत केलं. लग्नाला 2 वर्ष होऊनही प्रियकरावरील प्रेम नाही झालं कमी; तरुणीने उचललं मोठं पाऊल निमच शहरात हे अनोखं लग्न पाहायला मिळालं. ज्यात नवरी अॅक्टिव्हावर बसून लग्नमंडपात पोहोचली. तिने नवरदेवाला गाडीच्या मागील सीटवर बसवलं आणि मग दोघंही फेरे घेण्यासाठी पोहोचले.
हे दृश्य निमच शहरातील निमच सिटी रोड येथील कल्याणेश्वर मंदीर येथे पाहायला मिळालं. नवरीच्या या अनोख्या एन्ट्रीचे फोटो आणि व्हिडिओही (Viral Video of Bride) समोर आले आहेत.
मध्य प्रदेशमधील आगळावेगळा विवाह, कपलची अनोख्या पद्धतीने स्टेजवर एन्ट्री pic.twitter.com/RQRrVMZAAt
— News18Lokmat (@News18lokmat) January 18, 2022
16 जानेवारीला निमच येथील रहिवासी बालमुकन्द यांची मुलगी निलू दमामी हिचा विवाह कैलाश याच्यासोबत झाला. यानंतर वरात आल्यानंतर नवरीबाई आपल्या घरापासून मंडपापर्यंत अॅक्टिव्हा गाडीवर सवार होऊन गेली. नवरीला गाडीवर येताना पाहून लोक आश्चर्यचकीत झाले. लग्नमंडपाच्या गेटवर नवरदेव उभा होता. इथून पुढे गाडीच्या मागील सीटवर बसून नवरदेवही नवरीसोबत मंडपात गेला. लग्नाआधीच महिलेला समजलं होणाऱ्या पतीबद्दलचं धक्कादायक सत्य; रागात उचललं हे पाऊल नवरीच्या नातेवाईकांनी सांगितलं, की नवरीबाई निलूने आपण अॅक्टिव्हा घेऊन स्टेजवर जाणार असल्याचं सांगितलं. यासाठी सगळेच कुटुंबीय लगेच तयार झाले. यानंतर मोठ्या उत्साहात अॅक्टिव्हावर बसून नवरी आणि नवरदेव स्टेजवर पोहोचले. त्यांच्या मागे सर्व नातेवाईक नाचत मोठ्या आनंदात चालताना दिसले.