• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • पराभवानंतरही तब्बल 40 वर्ष कायम होता मिल्खा सिंग यांचा 'तो' रेकॉर्ड

पराभवानंतरही तब्बल 40 वर्ष कायम होता मिल्खा सिंग यांचा 'तो' रेकॉर्ड

मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्याबद्दल संपूर्ण देशानं पाहिलेलं एक स्वप्न 1960 साली अगदी थोडक्यात भंग पावलं. या पराभवानंतरही त्यांचा रेकॉर्ड तब्बल 40 वर्ष कायम होता.

 • Share this:
  मुंबई, 19 जून : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे कोरोनामुळे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी या महान खेळाडूनं मृत्यूशी निकारानं झुंज दिली, मात्र ही झुंज अखेर अपयशी ठरली. (Milkha Singh passed away)  रोमममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांचे कांस्य पदक (Bronze Medal) अगदी थोडक्यात हुकले. त्यावेळी संपूर्ण देशानं पाहिलेलं एक स्वप्न भंग झालं होतं. या पराभवानंतरही मिल्खा सिंग यांचा रेकॉर्ड तब्बल 40 वर्ष कायम होता. मिल्खा सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 75 स्पर्धांचं विजेतेपद पटकावले. मात्र रोम ऑलिम्पिकमधील पराभवाबद्दल त्यांची नेहमी चर्चा झाली. रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर शर्यत मिल्खा सिंह यांनी 45.6 सेकंदामध्ये पूर्ण केली. त्यावेळी सेकंदामधील काही फरकानं त्यांचे कांस्यपदक हुकले होते. मात्र या पराभवानंतरही मिल्खा यांनी नॅशनल रेकॉर्ड केला. हा रेकॉर्ड तब्बल 40 वर्ष कायम होता. मिल्खा यांनी या स्पर्धेत पदक न मिळण्याचं कारण एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. ते म्हणाले, माझी सवय होती, की प्रत्येक शर्यतीवेळी मी एकदा मागे वळून पाहायचो. ऑलिम्पिक स्पर्धेत शर्यत खूप जवळ होती आणि मी जबरदस्त सुरुवात केली. मात्र, यात मी एकदा मागे वळून पाहिलं आणि कदाचित ही चूक मला महागात पडली. मिल्खा सिंग यांना Flying Sikh नाव का पडलं? मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीसह (Narendra Modi) देशातील सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: