लंडन, 09 जुलै : लग्नाला यायचं… म्हणत सर्वांना लग्ना चं आमंत्रण दिलं जातं. बऱ्याच पत्रिकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की शेवटी एक ओळ असते. कृपया आहेर आणू नये किंवा कृपया भांड्याचा आहेर आणू नये. तसं हे सामान्य आहे. पण एका नवरीने आपल्या लग्नात आमंत्रित केलेल्या पाहुण्यांसाठी अशी विचित्र अट ठेवली की सर्वांना धक्का बसला. ही अट वाचून तुम्हीही शॉक व्हाल. नववधूची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. आपल्या लग्नात सर्वांनी येऊन आपल्याला सर्वांनी आपल्या आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा असते. सर्वांसमक्ष लग्न करण्याचा सामान्यपणे तोच हेतू असतो. पण या नवरीने पाहुण्यांना आपल्या लग्नात आमंत्रित करून त्यांच्यासमोरच अशी अट ठेवली की तुम्ही विचारही गेला नसेल. लग्नात नवरा-नवरी आशीर्वाद, शुभेच्छांसह भेटवस्तूही दिल्या जातात. कुणी पैशांचं पाकिट देतं, तर कुणी इतर गिफ्ट देतं. या नवरीने अशाच गिफ्टसंबंधी अट ठेवली आहे. पाहुण्यांकडून तिने महागडे गिफ्ट मागितले आहेत. आता महागडे गिफ्ट म्हणजे प्रत्येकाच्या ऐपतीनुसार वेगवेगळे असू शकतात. पण या नवरीने महागड्या गिफ्टची मर्यादा ठरवून दिली आहे. म्हणजे तिने एका विशिष्ट किमतीच्या खालील गिफ्ट आणू नये, असं स्पष्ट म्हटलं आहे.
तिने किमान 4000 रुपयांचे गिफ्ट आणावं, अशी डिमांड केली आहे. यापेक्षा कमी किमतीची भेटवस्तू आणू नका, असं तिनं सांगितलं. महागडी गिफ्ट आणा नाहीतर येऊ नका, असं ती म्हणाली. ऐकावं ते नवल! तरुणीने चक्क नाल्याशी केलं लग्न; विचित्र आहे, पण कारण कौतुकास्पद मिररच्या रिपोर्टनुसार त्यात तिनं लिहिलं आहे की, लग्नाला कोणी रिकाम्या हातानं येतं याचं खूप वाईट वाटतं. कारण आम्ही लग्नात लोकांसाठी ओपन बार आणि जेवण ठेवलं आहे, ज्यासाठी किमान 12 हजार रुपये खर्च येईल. अशा परिस्थितीत मिळालेली भेट थोडी वाजवी असावी. अशा स्थितीत भेट 4200 रुपयांपेक्षा कमी नसावी, ही भेटवस्तूची बाब नाही परंतु भेटवस्तू मागणं वाईट नाही असंही ती म्हणाली. दरम्यान तिच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांनी तिची भेटवस्तू मागण्याची ही कल्पना चुकीची आहे, ती स्वार्थी आहे. असं म्हटलं आहे. समोरच्या व्यक्तीचं प्रेम तुम्ही गिफ्टवरून ठरवू शकत नाही, गिफ्टची किंमत प्रेम ठरवत नाही, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहे. तिच्या या अजब मागणीला काही मोजक्याच लोकांनी समर्थन दिलं आहे. ‘सुहागरात’नंतर सकाळीच बाळ; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीच्या GOOD NEWS मुळे सासरचे शॉक तुमचं या नवरीबाईच्या या मागणीबाबत काय मत आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.