मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - नवरीबाईसोबत पंगा नवरदेवाच्या मित्रांना पडला भारी; नववधूने लग्नातच सर्वांसमोर खोड मोडली

VIDEO - नवरीबाईसोबत पंगा नवरदेवाच्या मित्रांना पडला भारी; नववधूने लग्नातच सर्वांसमोर खोड मोडली

नवरीबाईसोबत मजा करायला गेलेल्या नवरदेवाच्या मित्रांची झाली फजिती.

नवरीबाईसोबत मजा करायला गेलेल्या नवरदेवाच्या मित्रांची झाली फजिती.

नवरीबाईसोबत मजा करायला गेलेल्या नवरदेवाच्या मित्रांची झाली फजिती.

मुंबई, 14 डिसेंबर : लग्न (Wedding video) म्हटलं की मजामस्ती आलीच. नवरी आणि नवऱ्याचे मित्रमैत्रिणी त्यांना त्रास देण्याची एक संधी सोडत नाहीत (Bride groom video). असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत आहे. ज्यात नवरदेवाच्या मित्रांनी नवरीबाईसोबत मस्ती करण्याचा प्रयत्न केला (Groom friends and bride video). पण नवरीबाईसोबत पंगा घेणं नवरदेवाच्या मित्रांना चांगलंच महागात पडलं. नववधूने लग्नातच सर्वांसमोर त्यांची खोड मोडली आहे.

एकटी नवरी नवरदेवाच्या सर्व मित्रांना चांगलीच भारी पडली आहे. नवरदेवाचे मित्र तिच्यासोबत एक मजा करायला गेले पण मजेमजेत त्यांची फजिती झाली. नवरीबाई इतकी हुशार निघाली की तिच्या हुशारीसमोर नवरदेवाचे सर्व मित्र फेल ठरले. व्हिडीओ पाहून नेटिझन्स नवरीचं कौतुक करत आहेत.

" isDesktop="true" id="643282" >

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांना वरमाला घालण्यासाठी एकमेकांसमोर उभे आहेत. नवरदेवाचे काही मित्र तिथं आहेत. जशी नवरी वरमाला घालायला जाते, तसे ते नवरदेवाला उचलून उंचावर नेतात.

हे वाचा - 'आता मी आयुष्यभर...', लग्नात नवरीबाईचं ते रूप पाहून नवरदेवही घाबरला; पाहा VIDEO

नवरदेवाचे मित्र शेर असतील तर नवरीबाई सव्वाशेर आहे. आपणही काही कमी नाही हे तिनं दाखवून दिलं. तिने शक्ती नाही पण युक्ती लढवली आणि नवरदेवाच्या मित्रांची तिने चांगलीच खोड मोडली. जसं मित्रांनी नवऱ्याला उचललं तसं नवरी हातात वरमाला घेऊन गप्पपणे खुर्चीवर बसली. नवरदेवाच्या मित्रांना वाटलं की नवरीने हार मानली म्हणून ते बिनधास्तपणे नवऱ्याला खाली उतरवतात आणि हसू लागतात. तेव्हा नवरीबाई पटकन उठते आणि कुणी पाहणार त्याच्याआधीच ती नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घालून मोकळी होते.  नवरदेवासह त्याचे मित्रही शॉक होतात. त्यांची प्रतिक्रिया पाहूनच हसू आवरत नाही.

हे वाचा - 'दिलवाली दुल्हा ले जाएगी'; नवरीनं नवरदेवाच्या भांगात भरलं कुंकू, लग्नाचा VIDEO

HSO GAMING नावाच्या युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सना खूप आवडला नाही. नवरीच्या हुशारीला सर्वांनी दाद दिली आहे आणि नवरदेवाच्या मित्रांच्या झालेल्या फजितीचा पुरेपूर आनंद घेत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video