Home /News /viral /

नवरीबाई जोमात नवरदेव कोमात! स्वतःच्याच लग्नात घातला धिंगाणा; VIDEO VIRAL

नवरीबाई जोमात नवरदेव कोमात! स्वतःच्याच लग्नात घातला धिंगाणा; VIDEO VIRAL

नवरीबाईला पाहून नवरदेव शांतपणे बसून राहिला.

  मुंबई, 24 सप्टेंबर : लग्नात (Wedding Video) नवरा-नवरीचे (Bride groom video) एकमेकांसोबतचे रोमँटिक, इमोशनल आणि फनी क्षण तुम्ही पाहिले असतील. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात नवरा-नवरी एकत्र सर्वांचं लक्ष वेधतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) लग्नाचा असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात नवरी (Bride video) नवरदेवाला सोडून आपल्याच लग्नात धिंगाणा घालताना दिसली (Bride dance video). एरवी लग्नात नवरा-नवरी सोबतच दिसतात. पण या लग्नात मात्र नवरी नवरदेवासोबत नाही तर चक्क आपल्या मैत्रिणींसोबत दिसते आहे. तिने मैत्रिणींसोबत चांगलाच धिंगाणा घातली आहे. त्या नादात ती आपल्या नवऱ्यालाही विसरली आहे.
  व्हिडीओत पाहू शकता स्टेजवर नवरीच्या बऱ्याच मैत्रिणी जमा झाल्या आहेत. नवरी आपल्या मैत्रिणींसोबत दिसते आहे. मैत्रिणींसोबत ती ठुमके लगावते आहे. हे वाचा - VIDEO - भाओजीच्या नकळत मेहुणीने मारला चान्स; जबरदस्त प्लॅनिंग पाहून नवरदेव हैराण आपल्याच लग्नात नवरीबाई सैराट झाली आहे. जणू काही तिचं लग्न नाही तर कुणा दुसऱ्याचंच लग्न आहे अशी ती बिनधास्त नवरदेवाला एकट्याला सोडून नाचताना दिसते आहे. हरयाणी गाण्यावर ती थिरकते आहे. नवरदेव बिचारा तिथे फेऱ्या मारताना दिसतो आहे. तो गुपचूप येऊन एका बाजूला सोफ्यावर बसतो. नवरीबाईच्या मैत्रिणीसमोर आपण काही नाही हे त्याला समजलं आहे. म्हणून तो शांत एका कोपऱ्यात बसून राहिला. हे वाचा - लग्नातील मस्ती पडली भलतीच महागात; मंडपातून थेट रुग्णालयात पोहोचला नवरदेव हरियाणवी और पंजाबी कम्युनिटी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bride, Bridegroom, Dance video, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या