मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरीच्या घरी एन्ट्री करताच गगनात मावेना नवरदेवाचा आनंद; हा Video जिंकेल तुमचं मन

नवरीच्या घरी एन्ट्री करताच गगनात मावेना नवरदेवाचा आनंद; हा Video जिंकेल तुमचं मन

आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील स्वतःच्या लग्नात डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील स्वतःच्या लग्नात डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील स्वतःच्या लग्नात डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली 03 ऑगस्ट : सोशल मीडियावर अनेकदा लग्नसमारंभातील व्हिडिओ (Wedding Videos) व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर (Funny Videos) असतात, तर काही हैराण करणारे. काही व्हिडिओ तर असे असतात ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात नवरी आणि नवरदेव एकदम बिनधास्त डान्स (Bride and Groom Dance Video) करताना दिसत आहेत.

कोण म्हणतं वयानं म्हातारं होतं? 101 वर्षांच्या आजीचं काम पाहून तोंडात बोटं घालाल

आपल्या सर्वांना हे माहिती आहे, की लग्नात सर्वांचं लक्ष हे नवरी अन् नवरदेवाकडेच असतं. लग्नसमारंभात गाणी आणि डान्स यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीच वाढते. आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील स्वतःच्या लग्नात डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक नवरदेव आपल्याच वरातीत बिनधास्त डान्स करत आहे. तो बॉलिवूडचं प्रसिद्ध गाणं ‘तेरे घर आया, मैं आया तुझको लेने…’ वर डान्स करत आहे. नवरदेवाचा हा डान्स पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

रस्त्यावर धावत सुटला चिमुकला, वेगाने कार आली आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

नवरदेवाचा हा बिनधास्त अंदाज सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं लिहिलं, की नवरदेवाचा असा डान्स मी पहिल्यांदाच पाहिला आहे. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त परफॉर्मन्स. याशिवाय इतरही अनेकांनी कमेंट करत नवरदेवाच्या डान्सचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर द वेडिंग मेनिया नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

First published:

Tags: Bridegroom, Dance video, Wedding video