जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - सासरी जाताना नवरीबाईने पसरलं भोकाड; गाडीत बसताच नवरदेवाने असं काही केलं की आवाजच बंद झाला

VIDEO - सासरी जाताना नवरीबाईने पसरलं भोकाड; गाडीत बसताच नवरदेवाने असं काही केलं की आवाजच बंद झाला

VIDEO - सासरी जाताना नवरीबाईने पसरलं भोकाड; गाडीत बसताच नवरदेवाने असं काही केलं की आवाजच बंद झाला

रडणाऱ्या नवरीबाईसोबत गाडीत नवरदेवाने असं काही केलं की तिचं रडणं लगेच थांबलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जानेवारी : लग्नातील (Wedding video) सर्वात भावुक क्षण कोणता असतो तर तो नवरीमुलीच्या पाठवणीचा क्षण (Bride bidai video). तरी हल्ली लग्नात नवरीबाई माहेर सोडून सासरी जाताना रडत नाही. उलट हसत हसत आपल्या माहेरच्यांचा निरोप घेते आणि सासरची वाट धरते. पण तुम्ही याआधी पाहिलं असेल नवरी माहेरच्यांचा निरोप घेताना कशी सर्वांना घट्ट मिठी मारून हुंदके देत रडायची (Bride crying video). अगदी फिल्ममध्येही आपण असंच पाहत आलो आहेत. आता अशी रडणारी नवरी क्वचितच पाहायला मिळते. अशाच एका नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Bride groom video). नवरीबाई सासरी जायला निघाली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. ती हुंदके देत ढसाढसा रडू लागली. गाडीत बसताच रडणाऱ्या या नवरीबाईला पाहून नवरदेवाने जे केलं त्याचीच चर्चा होते आहे. व्हिडीओत पाहू शकता गाडीत बसताच नवरीबाई लहान मूल रडावं तसं भोकाड पसरून रडते. तिच्या शेजारी तिचा नवरदेव बसलेला आहे. तो सुरुवातीला तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण नवरीबाई काही शांत होण्याचं नाव घेत नाही. हे वाचा -  लग्नात वाजलेल्या गाण्यामुळे चढला नवरदेवाचा पारा; नवरीबाईला मंडपातच घटस्फोट दिला अखेर नवरदेव तिच्यासोबत असं काही करतो की काही क्षणातच तिचं रडणं थांबत, ती एकदम शांत होते.

जाहिरात

नवरदेव रडणाऱ्या नवरीला  जादू की झप्पी देतो. म्हणजे तिला आपल्या मिठीत घेतो. नवऱ्याच्या खांद्यावर नवरीबाई आपलं डोकं टेकवते आणि  त्याचवेळी ती रडणंही थांबवते. हे वाचा -  VIDEO - ठुमके सोडून महिलांचं एकमेकींना ‘दे दणादण’; भांडण सोडवणाऱ्यालाही तुडवलं weddingcouplepage नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एकंदर व्हिडीओ पाहिला तर नवरीबाई इतक्या मोठ्याने रडण्याचं नाटक करत असल्याचंही दिसतं. हा व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात