आधी बाप मिठी मारून ढसाढसा रडला आणि नंतर...; कधीच पाहिली नसेल लेकीची अशी पाठवणी

आधी बाप मिठी मारून ढसाढसा रडला आणि नंतर...; कधीच पाहिली नसेल लेकीची अशी पाठवणी

नववधूची सासरी पाठवणी (Bride Vidai) करताना असा ट्विस्ट तुम्ही पाहणं तर दूर कधी तुमच्या विचारातही आला नसेल.

  • Share this:

मुंबई, 01 मे : नवरीची सासरी  (Bride Vidai) पाठवणी करताना तसे बरेच हटके व्हिडीओ पाहिले असतील. नवरीच्या काय लक्षात राहिल अशी माहेरून तिची सासरी पाठणी केली जाते. सध्या तर बहुतेक पालखी, गाडीऐवजी हेलिकॉप्टरमधूनच सासरी नेलं जातं. पण सोशल मीडियावर नववधूच्या पाठवणीचा (Bride Vidai video) एक असा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो, जो तुम्ही कधीच पाहिला नसेल.

सोशल मीडियावर नवरीच्या पाठवणीचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये नववधू आणि तिचे वडील दोघंही भावुक होताच. दोघंही ढसाढसा रडत एकमेकांना मिठी मारतात. पण पुढे मात्र या व्हिडीओत असा ट्विस्ट येतो, ज्याची कल्पना तुम्ही कधीच केली नसेल.

व्हिडीओत पाहू शकता. गावाच्या वेशीवरून माहेरची मंडळी नववधूची सासरी पठवण करत आहेत.

हे वाचा - आता हद्दच झाली! ATM मध्ये Hand Sanitizer वर मारला डल्ला; चोरीचा VIDEO VIRAL

आपल्या वरासोबत सासरी जाताना वडिलांना मिठी मारून रडते. आपली लेक आपल्याला कायमची सोडून जाते आहे म्हणून वडिलांच्याही अश्रूंचा बांध फुटतो. आपल्या काळजावर दगड ठेवत काळजाचा तुकडा दुसऱ्या मुलाच्या स्वाधीन करतात. नववधू काही अंतरावर गेल्यावर पुन्हा रडत मागे येत आपल्या वडिलांना मिठी मारतं. असं खूप वेळा होतं. सासरी जाताना लेक पुन्हा पुन्हा मागे येते. शेवटी बापही वैतागतो. तो यावेळी लेकीला मिठी मारत नाही तर पायातली चप्पल काढून मारतो. तेव्हा कुठे मुलगी सासरचा मार्ग धरते आणि परत मागे येत नाही.

हे वाचा - कर्फ्यूदरम्यान मैत्रिणी पडल्या घराबाहेर; VIDEO मध्ये पाहा काय झालेत हाल!

हा मजेशीर व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपीन शर्मा यांनी शेअर केला आहे. तो पोस्ट करताना त्यांनी याला कोरोनाचा संदर्भ देण्यात आला आहे. देशात कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण आता कोरोनाची पुन्हा दुसरी लाट आली आहे. आता जर कोरोना गेला नाही तर कोरोनाची पाठवणीसुद्धा अशीच होईल. कोरोनाच्या पाठवणीच्या आधीचा नजारा असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

Published by: Priya Lad
First published: May 1, 2021, 7:57 PM IST

ताज्या बातम्या