नवी दिल्ली, 1 मे : देशभरातील कोरोना वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहे. त्याअंतर्गत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. आतापर्यंत अनेकांना विनाकारण घराबाहेर पडले म्हणून भररस्त्यात कोंबडा बनविणे किंवा अगदी उठा-बशा काढण्यासारखा शिक्षा दिल्या जात आहेत. यामध्ये केवळ मुलंच नाही तर मुलींनाही अशी शिक्षा दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशोका नगर येथील हा व्हिडिओ असून यामध्ये मुलींना शिक्षा दिली जात आहे. चंदेरी जिल्हा भागात मुलींना कोंबडा बनवलं. या मुली विनाकारण रस्त्यावर फिरत असताना दिसल्या. मग तर काय पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. आता नियम तोडला म्हणजे शिक्षा तर होणारचं. मग ते मुलगे असो वा मुली. महिला पोलीस सब इन्स्पेक्टरने या मुलींना तेथेच शिक्षा दिली. त्यांना उठा-बशा काढायला लावल्या आणि त्यांना कोंबडाही करायला लावला. या जिल्ह्यात 144 आणि कोरोना कर्फ्यू लागू केल्यानंतरही लोक रस्त्यावर उतरत आहेत. हे ही वाचा- तुम्हीच ठरवा कोणती कोरोना लस योग्य? मोदी सरकारने सर्वसामान्यांवर सोपवला निर्णय
कोरोनामुळे (Coronavirus) देशात चिंतेचं वातावरण आहे. रुग्णसंख्येत आणखी किती वाढ होणार, याबद्दल काहीही अंदाज नाही. अशात आता शुक्रवारची रुग्णसंख्या (Coronavirus Latest Update) समोर आली असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी चोवीस तासात देशात 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 4 लाख 02 हजार 110 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 57 हजार 094 इतकी झाली आहे. यासोबतच देशातील सक्रीय रुग्णांची संख्याही 32 लाखाहून अधिक झाली आहे.