मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला; बाटलीभर दारुसाठी मुंबईतील तरुणीला 61 हजारांचा गंडा

चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला; बाटलीभर दारुसाठी मुंबईतील तरुणीला 61 हजारांचा गंडा

एका बाटलीभर दारूसाठी (for a bottle of liquor) मुंबईतील एका तरुणीला तब्बल 61 हजार रुपयांचा गंडा (Fraud) घातल्याची घटना समोर आली आहे.

एका बाटलीभर दारूसाठी (for a bottle of liquor) मुंबईतील एका तरुणीला तब्बल 61 हजार रुपयांचा गंडा (Fraud) घातल्याची घटना समोर आली आहे.

एका बाटलीभर दारूसाठी (for a bottle of liquor) मुंबईतील एका तरुणीला तब्बल 61 हजार रुपयांचा गंडा (Fraud) घातल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 जून: एका बाटलीभर दारूसाठी (for a bottle of liquor) मुंबईतील एका तरुणीला तब्बल 61 हजार रुपयांचा गंडा (Fraud) घातल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी तरुणीनं ऑनलाइन संकेतस्थळाचा वापर करून मद्य मागवलं होतं. त्यासाठी सायबर भामट्यानं तिला 1720 रुपयांच्या बिलाच्या रकमेचा क्युआर कोड (QR Code) पाठवला होता. पण ऑर्डर (Online Order) दिल्यानंतर 2 तास उलटूनही मद्य घरपोहोच झालं नाही. त्यामुळे तिनं संबंधित क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला असता. आरोपींनी तिला बोलण्यात गुंतवून 61 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी फिर्यादी तरुणीनं मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

दक्षिण मुंबईत राहाणाऱ्या फिर्यादी तरुणीच्या घरी काल विकेंडमुळे तिच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या. त्या घरात बसून मद्य पार्टी करण्याचा त्यांचा बेत होता. त्यामुळे त्यांनी झुगाड लावून ऑनलाइन मद्य विक्रीचं संकेतस्थळ शोधून काढलं. संकेतस्थळावर उपलब्ध मोबाइल नंबरवर संपर्क करून त्यांनी मद्याची ऑनलाइन खरेदी केली. त्यांच्या मद्याचं एकूण बील 1720 रुपये झालं होतं. त्याप्रमाणे आरोपी तरुणानं त्यांनी बिलासाठी एक क्युआर कोड पाठवला. तरुणींनंही डोळे झाकून विश्वास ठेवत क्युआर कोड स्कॅन करत बिलाची रक्कम अदा केली.

ऑर्डर दिल्यानंतर दोन तास उलटले तरीही मद्य घरपोहोच न मिळाल्यानं फिर्यादी तरुणीनं पुन्हा त्याच क्रमांकावर संपर्क साधला आणि पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीनं फिर्यादी तरुणीला बोलण्यात गुंतवलं. दरम्यान संबंधित सायबर चोरट्यानं तरुणीला 19,801 रुपयांचे तीन व्यवहार करण्यास भाग पाडलं. तरुणीला काही कळायच्या आत आरोपीनं तिच्या अकाऊंटमधून 61 हजार रुपये आपल्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले.

हेही वाचा-आधी भाड्याने घेतलं दुकानं नंतर पाडलं भगदाड, कोट्यवधीचं सोनं लुटणार तेच...

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित तरुणीनं मलबार हिल पोलीस ठाण्यात धाव घेत. अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपी सायबर चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Liquor stock, Mumbai, Online fraud