Home /News /viral /

कुछ तुफानी करते है! खाली खोल दरी, तरी उभं राहून तारेवरून सुसाट पळवली बाईक; खतरनाक STUNT VIDEO VIRAL

कुछ तुफानी करते है! खाली खोल दरी, तरी उभं राहून तारेवरून सुसाट पळवली बाईक; खतरनाक STUNT VIDEO VIRAL

श्वास रोखून धरायला लावणारा बाईक स्टंटचा हा व्हिडीओ.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : डोंबाऱ्याचा खेळ तर तुम्ही पाहिलाच असेल. आपल्या दोन्ही हातात काठी घेऊन दोरीवरून चालणारी मुलगी अगदी जमिनीपासून काही अंतरावर असते. पण हा खेळ पाहताना आपल्याला धडकीच भरते (Stunt video). विचार करा असा खेळ एखाद्या खोल दरीच्या वर खेळला गेला आणि दोरीवरून चक्क बाईक (Bike stunt video) पळवली तर... हे शक्यच नाही असं तुम्हाला वाटेल. पण तुम्हा-आम्हाला अशक्य वाटणारा हा जीवघेण्या खेळाचा व्हिडीओ समोर आला आहे (Bike stunt over deep valley video). एक तरुणाने चक्क खोल दरीच्या वर एका तारेवर आपली बाईक चालवली. फक्त बाईक चालवली नाही तर चक्क त्यावर उभं राहून त्याने ही बाईक सुसाट पळवली. बाईकसोबत त्याने बरेच स्टंट करून दाखवले. व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकेल. हृदयाची धडधड वाढेल. अंगावर अक्षरशः काटा येईल. 2 मिनिटं 20 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता दोन डोंगरांच्यामध्ये एक लोखंडी तार बांधली आहे. त्यावर दोन व्यक्ती सायकल घेऊन उभ्या आहेत. खोल दरीच्या मधोमध पोहोचल्यावर सायकल मध्येच थांबतात. काही वेळाने मागून एक व्यक्ती बाईक घेऊन येते आणि एका सायकलला धक्का मारते. इतकंच नव्हे तर त्याच तारेवर तो तरुण ती बाईक टर्नसुद्धा करतो. हे वाचा - OMG! हत्तीसोबत Seesaw वर उभा राहिला तरुण; पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा VIDEO तुम्ही नीट पाहिलं तर बाईकवर हा तरुण एकटा नाही तर बाईकला खाली आणखी एक तरुण लटकलेला आहे. तोसुद्धा वेगवेगळे स्टंट करताना दिसतो आहे. बाईक टर्न करताच बाईकवरील तरुण बाईक सुसाट पळवतो, त्याचवेळी तो बाईकवर उभाही राहतो. बाईक तशीच तारवर वेगाने धावत असते. व्हिडीओ पाहून आपल्यालाही धडकी भरते. एकाचा जरी तोल थोडाही ढासळला असता तर तारेवरील प्रत्येका जीव गेला असता. हे वाचा - अरे आंटी जी! महिलेचा सर्वांसमोर 'खटिया तोड' डान्स; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल आयएएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. एकंदर व्हिडीओ पाहून या सर्वांनी या खतरनाक स्टंटसाठी खूप मेहनत घेतल्याचं दिसतं आहे. त्यांनी खूप सराव केला आहे. अगदी ते या स्टंटसाठी प्रशिक्षित आहे. कृपया तुम्ही असे जीवघेणे स्टंट करण्याची डेअरिंग करू नका.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Stunt video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या