नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : आंटी जी...आंटी जी... (Aunty dance video) गेट अप अँड डान्स एका फिल्मधील हे गाणं आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) अशा आंटीजी व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. जी डान्सर फ्लोअरवर नाही तर चक्क खाटीवर डान्स करते (Dance video) आहे. डान्स फ्लोअरवर ठुमके लगावणाऱ्या आंटीचे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण खाटीवर डान्स करत या आंटीने आग लावली आहे (Woman dance on khatiya).
एका महिलेने चक्क खाटीवर डान्स केला आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं आहे. तर या महिलेने ज्या खाटीवर डान्स केला ती खाट आडवी नाही तर उभी आहे. उभ्या खाटीवर चढून या महिलेने जबरदस्त ठुमके लगावले आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता एक महिला सलवार सूटमध्ये आहे. तिच्यासमोर दोघांनी एक खाट उभी धरली आहे. ही महिला त्या खाटीवर चढते आणि डान्स करू लागते. उभ्या खाटीवरच ती ठुमके लगावते. एकएक स्टेप्स अशा करते ही पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. खाटीवर बिनधास्त डान्स करणाऱ्या या महिलेचा तोल ढासळला असता किंवा खाट पकडणाऱ्या व्यक्तींच्या हातून खाट सटकली असती तर ही महिला धाडकन जमिनीवर कोसळली असती आणि तिला दुखापतही झाली असते.
हे वाचा - भावाचा बड्डे! कांदिवली स्टेशनजवळ तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा, पाहा VIDEO
haryanvi_kti_zehar इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आंटीजीचा हरयाणवी गाण्यावर डान्स असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. आंटीजीचा हा डान्स करण्याचा अंदाज सर्वांना आवडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Viral, Viral videos